• Sun. Sep 6th, 2026

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी सन्मान व पुरस्कार सोहळा संपन्न – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 1, 2026
राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी सन्मान व पुरस्कार सोहळा संपन्न – महासंवाद

मुंबई,दि.१: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत २०२३ व २०२४ या वर्षांमधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न,  वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण यांसह विविध कृषी पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा संपन्न झाला.

यावेळी १८९ शेतकरी, संस्था व गटांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉप वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषीराज्य मंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे आदी या कृषी सन्मान सोहळ्याला उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed