• Sun. Jun 28th, 2026
    Siya Goyal : सियाच्या जवळच्या दोन मैत्रिणींची चौकशी होणार, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठे गुपित उलगडणार

    Ketan Agarwal Murder Case Sia’s Two Friends Inquiry : पुणे लोहगडावर घडलेलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आरोपी सिया गोयलचे अनेक गुपित उघड होणार असल्याची शक्यता आहे.

    पुणे लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरण सिया गोयल मैत्रणींची चौकशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणाचा छडा लावण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आता तपासाचा वेग आणखी वाढवला आहे. 29 जून रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीपूर्वी या गुन्ह्यातील प्रत्येक भक्कम पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आज दोन महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत.

    जिवाभावाच्या मैत्रिणींना चौकशीला बोलावलं

    मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिच्या दोन अत्यंत जवळच्या मैत्रिणींना पोलिसांनी चौकशीसाठी लोणावळा पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. या चौकशीदरम्यान अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता: आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया या दोन्ही मैत्रिणींच्या सतत संपर्कात होती आणि तिच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक गोष्टी ती या दोघींशी शेअर करत होती. या दोघींना कटाची पूर्वकल्पना होती का? केतनच्या हत्येचा कट रचण्यापूर्वी किंवा तो अमलात आणताना सियाच्या मनात नेमकं काय सुरू होतं? तिचे प्रियकर चेतन चौधरीसोबतचे संबंध आणि तिच्या इतर सवयी, या सर्वांची माहिती या मैत्रिणींना असण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्यांच्या जबाबातून या हत्येच्या कटाची नवीन गुपिते समोर येऊ शकतात.
    Maharashtra TimesMayank Lohar : मयंकचा जीव धोक्यात, बाकीच्या प्रवाशांनी रोशनला धरलं का नाही? सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षदर्शीने दिलं; डब्यात एकच गोंधळ उडाला

    सख्ख्या भावाचाही चौकशी

    केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत असून काल आरोपी सिया गोयलच्या भावाची पोलिसांकडून 10 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत सियाच्या भावानं मोठी माहिती दिली. पोलीस चौकशीत सियानं मला केतनसोबत लग्न करायचं नाही, हे कुटुंबीयांना सांगितल्याचं म्हटलं होतं. पंरतु सियाच्या भावाने तिला तोंडावर पाडणारा जबाब पोलिसांना दिला आहे. केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं, असं या चौकशीत सियाचा भाऊ साहिल गोयलनं पोलिसांना सांगितलं. सियानं मला किंवा कुटुंबीयांना काहीही सांगितलं नाही, सियानं सांगितलं असतं तर कुटुंबीयांनी तिचं लग्न लावलं नसतं, असंही साहिल गोयलने म्हटलं आहे.
    Maharashtra TimesSiya Chetan Love Story : काय क्रिकेट खेळतो! दादाच्या मॅच पाहताना मित्र मनात भरला, सिया-चेतनची पहिली ओळख, कॉमन फ्रेण्डमुळे नातं बहरलं

    क्रिकेटच्या सामनादरम्यान ओळख

    केतन अग्रवालची हत्या करणाऱ्या सिया आणि चेतनची पहिली ओळख क्रिकेटच्या सामनादरम्यान झाली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे एकत्र क्रिकेट खेळायचे. सिया तिचा भाऊ साहिलसोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी जात असताना तिची चेतनशी ओळख झाली. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली आणि भेटीगाठी वाढत गेल्या. क्रिकेटच्या मैदानावर झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा