• Mon. Jun 29th, 2026
    मुंबईकर निखिल राणेने भारताची मान जगात उंचावली, संगीतात्मक शीळवादन स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

    World Whistlers Convention : मुंबईच्या ताडदेव परिसरात लहानाचा मोठा झालेल्या निखिल राणेने आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर संगीतात्मक शीळवादन या दुर्मिळ कलेतून जागतिक स्तरावर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईच्या ताडदेव परिसरात लहानाचा मोठा झालेल्या निखिल राणे याने आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर संगीतात्मक शीळवादन या दुर्मिळ कलेमार्फत जागतिक स्तरावर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तब्बल १५३ स्पर्धकांमधून निखिलने तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान पटकवला. निखिलने यंदा वर्ल्ड व्हिस्लिंग कन्व्हेंशनमध्ये पाचव्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले. यावेळी तो एकटाच नाही तर त्याची विद्यार्थिनी – अबोली हिच्यासोबत स्पर्धेत सहभागी झाला होता.

    दोन वेळा विश्वविजेतेपद

    २०१६ आणि २०१८ मध्ये जपानमध्ये आयोजित ‘जागतिक शीळवादन स्पर्धेत’ ( World Whistlers Convention ) सलग दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावत निखिलने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले. केवळ स्पर्धांमध्ये यश मिळवण्यापुरते मर्यादित न राहता, निखिल विविध मैफिली, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संगीतात्मक शीळवादनाचा प्रसार करतो आहे.

    शीळवादन कलेचा जागतिक प्रतिनिधी

    या अनोख्या कलेला तिची स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी निखिल सातत्याने कार्यरत असून, भारत आणि जगभरातील कलाकारांमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण घडवून आणण्यातही त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कलात्मक नावीन्य, उत्कृष्ट सादरीकरण आणि अथक समर्पण यांच्या बळावर निखिल राणे आज भारतीय शीळवादन कलेचा जागतिक प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो.
    Maharashtra TimesPune Crime : ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टर्ड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब

    पाचव्यांदा भारताचे प्रतिनिधित्व

    २०२६ मध्ये निखिलने वर्ल्ड व्हिस्लिंग कन्व्हेंशनमध्ये पाचव्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले. यंदा तो एकटाच नाही तर त्याची विद्यार्थिनी – अबोली देखील त्याच्याबरोबर ह्या स्पर्धेत सहभागी होती.

    VIDEO | एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं

    विद्यार्थिनीच्या साथीने स्पर्धेत उतरला

    १८ ते २१ जून दरम्यान जपानमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत, तब्बल १५३ स्पर्धकांपैकी निखिल आणि अबोली हे दोघेच भारतीय स्पर्धक होते. Allied Arts ह्या स्पर्धेतील सगळ्यात कठीण मानल्या जाणाऱ्या प्रकारात निखिल आणि अबोली यांनी तृतीय क्रमांक पटकावून भारताचे नाव पुन्हा एकदा उज्वल केले आहे.
    Maharashtra TimesMayank Lohar : मयंकचा जीव धोक्यात, बाकीच्या प्रवाशांनी रोशनला धरलं का नाही? सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षदर्शीने दिलं; डब्यात एकच गोंधळ उडाला
    आपल्या मराठी मुलाला केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर आपल्या देशाचे नाव मोठे करताना बघून आनंद आणि अभिमान व्यक्त केला जात आहे, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा