Shivsena News: उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे-फडणवीस यांच्या विमान प्रवासावरही भाष्य केलं आहे.
फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित विमान प्रवास; शिंदेंनी मोजक्या शब्दांत घेतला समाचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रायगड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तब्बल सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी करत ठाकरेंच्या सहा खासदारांना गळाला लावले. आता या मोठ्या राजकीय धक्क्यानंतर उद्धव ठाकरे या सहा खासदारांच्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना टोला लगावत शिंदे यांनी त्यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे यांना आता जाहीर सभा मीच घ्यायला लावल्या आहेत, त्यांना सगळ्यांना कामाला लावलं आहे, असं ते म्हणाले. शनिवारी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “खरं म्हणजे एक म्हण आहे, वराती मागून घोडे. सगळे खासदार गेल्यावर आता हे तिथे पोहोचत आहेत. त्याचा काय उपयोग आहे? जो बुंद से गई वह हौद से नही आती है,” अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावलं आहे.
एकत्रित विमान प्रवासावर काय म्हणाले शिंदे?
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी एकत्रित विमान प्रवास केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम्ही उच्चस्तरीय चर्चा केली, असं हसत उत्तर दिलं होतं. यावर एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले की, “विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं. पण त्यांनी बेईमानी केली. 2019 ला महाराष्ट्रातील जनतेने एकत्रित प्रवास करण्याची संधी दिली होती, पण त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला. 2019 ला कपटी मित्र किती घातक असतो हे देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलं आहे. त्यामुळे मला यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही,” असं हसत हसत उत्तर शिंदे यांनी दिलं आहे.
दरम्यान, “आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही आलो आहोत. भरत गोगावलेही मावळे म्हणून आले आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णयही लवकर होईल. काही अडचण नाही,” अशी प्रतिक्रियाही शिंदे यांनी यावेळी दिली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा