• Sun. Jun 28th, 2026

    Mumbai News: जनगणनेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांकडून प्रश्नांच्या फैरी; मुंबईत नेमकं काय घडलं?

    Mumbai News: जनगणनेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांकडून प्रश्नांच्या फैरी; मुंबईत नेमकं काय घडलं?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नातेसंबंधांच्या बदलत्या व्याख्या आणि त्यांचे बदलते पैलू आता सामाजिक व्यवस्थेवरही परिणाम करू लागले आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेदरम्यान प्रगणकांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या काही जोडप्यांकडून प्रश्नोत्तरांच्या फैरींना सामोरे जावे लागले.
    घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात कुटुंबातील सदस्यांची माहिती, घराची स्थिती, घराचा प्रकार, भिंती व छप्पर, पाणी व शौचालयाच्या सुविधा, घराची अंतर्गत रचना, स्वयंपाकघर आदी विविध बाबींची नोंद करण्यात आली. प्रगणकांना देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुटुंबात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या नोंदवणे अपेक्षित होते. विवाहित जोडप्यांची संख्या नोंदवताना त्यांच्या वयाचा विचार करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, एखाद्या व्यक्तीने आपण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सांगितले, तरीही अशा जोडप्यांची नोंद विवाहित जोडपे म्हणून करण्याचे स्पष्ट निर्देश प्रगणकांना देण्यात आले होते.

    या नोंदीवर काही लिव्ह-इन जोडप्यांनी आक्षेप घेतला. प्रगणकांना त्यावरून ‘बौद्धिक’ ही देण्यात आले. ‘लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय हा दोन स्वतंत्र व्यक्तींचा असतो. आम्ही भविष्यात विवाह करू की नाही, आमचे नाते अधिक दृढ होईल का, किंवा आम्ही एकमेकांसाठी अनुरूप आहोत का, याचा आम्ही अद्याप विचार करत आहोत. मग आमची नोंद विवाहित म्हणून कोणत्या आधारावर केली जाते?’ असा प्रश्न काही जोडप्यांनी प्रगणकांना विचारला. घाटकोपर, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात घरगणनेचे काम करणाऱ्या काही प्रगणकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, लिव्ह-इन जोडप्यांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त होते. मात्र, मार्गदर्शक सूचनांनुसारच नोंदी करण्यात आल्या.

    मार्गदर्शक सूचनांनुसार, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये ‘स्टेबल डी-फॅक्टो युनियन’ म्हणून एकत्र राहणाऱ्या जोडप्यांची गणना विवाहित जोडपे म्हणून करायची आहे. तसेच, एखाद्या विवाहित जोडप्यातील पती किंवा पत्नी तात्पुरते अनुपस्थित असले, तरी त्यांची नोंद संबंधित कुटुंबाचा भाग म्हणून करायची आहे. एखाद्या घरात एकही विवाहित जोडपे राहत नसेल किंवा व्यक्ती एकटी राहत असेल, तर त्या रकान्यात ‘शून्य’ अशी नोंद करण्याच्या सूचनाही आहेत. तर, ‘लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांशी संबंधित प्रश्न मागील जनगणनेदरम्यान उद्भवले नव्हते. बदलत्या सामाजिक वास्तवाचा विचार करून अशा नातेसंबंधांचा लोकसंख्या व सामाजिक अभ्यासात स्वतंत्रपणे विचार होणे आवश्यक आहे, याकडे सामाजिक अभ्यासक डॉ. व्ही. पी. पांढरे यांनी लक्ष वेधले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed