अमळनेरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंतपणी माणसाला किंमत आहे की नाही? हा एक गंभीर प्रश्न असतानाच, मेलेल्या माणसाचे मृतदेह वाहून नेण्यासाठी चक्क घंटा गाडीचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते, इमारती किंवा विकासकामांवरून होत नाही, तर तेथील प्रशासन जिवंत आणि मृत नागरिकांशी किती सन्मानाने वागते? यावरूनही ठरते. मात्र अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटनांनी नगरपरिषदेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, शहराच्या हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या बेवारस प्रेताची शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र वाहनातून विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.
हे काम कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला बंधनकारक असताना देखील एक बेवारस प्रेताची ग्रामीण रुग्णालयातून विल्हेवाट लावताना चक्क कचरा वाहणाऱ्या घंटा गाडीतून वाहून नेण्यात आल्याचा असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मृत्यूनंतरही माणसाच्या सन्मानाची अशी पायमल्ली होत असेल तर ही केवळ प्रशासकीय अथवा ठेकेदाराची चूक नसून मानवतेलाच काळिमा फासणारी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नगरसेवकांचा गंभीर आरोप
या घटनेपूर्वी देखील अमरधाम स्मशानभूमीतील विदारक वास्तवही समोर आले होते. प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष दुर्गेश पाटील यांनी केलेल्या आरोपांनुसार, अंत्यसंस्कारासाठी पुरेसे सरण (गौरी )उपलब्ध नसल्याने अनेक मृतदेह पूर्णपणे जळत नाहीत. परिणामी अर्धवट जळालेल्या अवशेषांची भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडून विटंबना होत असल्याचे प्रकार वारंवार घडत होता. याशिवाय स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने दुःखाच्या प्रसंगी आलेल्या नातेवाईकांनाच सर्व व्यवस्था स्वतः करावी लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली होती.
शहरातील जलकुंभाची अस्वच्छता
दरम्यानच्या काळात, शहरातील पाणी पुरवठ्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी स्वतः जलकुंभात उतरून पाहणी केल्यानंतर गेल्या 22 ते 24 वर्षांपासून जलकुंभाची स्वच्छता झाली नसल्याचा दावा केला. टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशीही मोठा खेळ झाल्याचा आरोप होत आहे.
या तीनही घटना एकत्र पाहिल्यास एक गंभीर चित्र समोर येते. जिवंत असताना नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही, मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्काराची हमी नाही आणि स्मशानभूमीतही मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांकडून प्रश्न उपस्थित
नागरिकांना पडलेला प्रश्न आहे की शहराच्या विकासाच्या घोषणा करणारे प्रशासन माणसाच्या जगण्याचा आणि मृत्यूनंतरच्या सन्मानाचाही विचार करणार आहे का? मात्र, कचरा वाहणाऱ्या घंटा गाडीतून मृतदेह नेल्याच्या घटनेबाबत संबंधित प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण दिल्यास किंवा चौकशीत वेगळे निष्कर्ष समोर आल्यास तेही तितक्याच ठळकपणे जनतेसमोर मांडले जाणे आवश्यक आहे. अशा संवेदनशील प्रकरणात वस्तुस्थिती स्पष्ट करणे ही प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.
प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया जारी
अमळनेर नगरपरिषदचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “झालेला प्रकार हा असंवेदनशील असून कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला बेवारस प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सोय करणे बंधनकारक आहे. असं असताना देखील संबंधित ठेकेदाराने अक्षम्य चूक केलेली असल्यामुळे त्याला नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारींनी दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा