Mumbai Local Train Murder : मुसळधार पावसामुळे ट्रेनच्या डब्याचा दरवाजा बंद ठेवण्यावरुन वाद झाल्यानंतर रोशन सुवर्णा याने मयंक लोहार याच्यावर पहिला वार केला होता, असा दावाही प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने केला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : “इतका भयंकर गुन्हा आणि इतक्या प्रमाणात रक्त मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते… ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोरुन जात नाहीये.” मुंबई लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याच्या अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना या शब्दात थराराचे वर्णन केले. मुसळधार पावसामुळे ट्रेनच्या डब्याचा दरवाजा बंद ठेवण्यावरुन वाद झाल्यानंतर रोशन सुवर्णा याने मयंकवर पहिला वार केला होता, असा दावाही प्रत्यक्षदर्शीने केला. पसार झालेल्या रोशनला सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधून काढत अटक करण्यात आली.
जीआरपी अधिकाऱ्यांनी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या भक्कम करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजसह विविध पुरावे गोळा केले जात आहेत. साक्षीदाराने सांगितले की, मंगळवारी रात्री नालासोपाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात २०-२५ प्रवासी होते. त्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही समावेश होता.
दारुच्या धुंदीत दिसत होता
“रोशन स्पष्टपणे मद्यधुंद अवस्थेत दिसत होता. तो डब्याच्या दाराशी उभा होता आणि मयंकही तिथेच होता. रोशनला दार उघडे ठेवायचे होते, पण पावसाचे पाणी आत येत असल्याने मयंकने ते बंद केले. त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रोशनने मयंकवर पहिल्यांदा अरेरावी केली; त्यावर मयंकनेही प्रत्युत्तर दिले” असे साक्षीदाराने सांगितले. Pune Crime : ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टर्ड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब “थोड्याच वेळात इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली आणि रोशनला धक्काबुक्की केली. त्याला दुसऱ्या दरवाजाकडे जाण्यास सांगण्यात आले. कदाचित त्यामुळे त्याचा अहंकार दुखावला असावा. त्याने चाकू काढला आणि तो मयंकच्या दिशेने चालत गेला. आम्ही त्याला वार करताना पाहिले…” असे साक्षीदार म्हणाला.
आधी शिवीगाळ, मग पत्रकारांना धमकी; एकनाथ शिंदेंच्या सुचनेनंतर संजय दिना पाटील नरमले
प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला
“प्रवासी आरडाओरड करत आणि इकडे-तिकडे धावू लागल्याने डब्यात एकच गोंधळ उडाला. रोशन ज्या दरवाजाजवळ उभा होता, तिथे परत जात असताना त्याने इतर प्रवाशांच्या दिशेने चाकू फिरवला. त्यामुळे मयंकजवळ जाता-जाता, आम्ही त्याच्यापासून दूर, डब्याच्या दुसऱ्या टोकाकडे सरकलो. बोरीवली स्थानकावर गाडी पूर्ण थांबण्याआधीच त्याने आपली बॅग आणि चाकू घेतला व तो खाली उतरला.” असेही प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितले. मयंकवर वार होताना इतक प्रवासी काय करत होते, असा सवाल उपस्थित होत असताना प्रत्यक्षदर्शीचे उत्तर महत्त्वाचे ठरते. Siya Chetan Love Story : काय क्रिकेट खेळतो! दादाच्या मॅच पाहताना मित्र मनात भरला, सिया-चेतनची पहिली ओळख, कॉमन फ्रेण्डमुळे नातं बहरलं
मयंकचे डोळे उघडे होते
“एका प्रवाशाने मयंककडे धाव घेतली, त्याचे डोळे उघडे होते, त्याला श्वास चालू ठेवण्यास व शुद्धीत राहण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला” असे साक्षीदाराने सांगितले. “जेव्हा गाडी बोरिवलीला थांबली, तेव्हा आम्ही आरडाओरडा करून जीआरपी आणि आरपीएफ अधिकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर स्ट्रेचर आणण्यात आले आणि मयंकला बाहेर काढण्यात आले,” असेही त्यांनी सांगितले. एका प्रवाशाने हत्येनंतर रोशन चाकू हवेत फिरवतानाचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले होते, ती क्लिप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा