म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: रक्ताची चोरी, रक्तसंकलन प्रक्रियेतील गैरव्यवहाराप्रकरणी मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या जेजे महानगर रक्तपेढीला अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए) सील केल्यानंतर आता बदलापूर येथील माया रक्तपेढीवर कारवाईचा दट्ट्या उगारण्यात आला आहे. जेजे महानगर रक्तपेढीचे संचालक डॉ. हितेश पगारे आणि सामाजिक वैद्यकीय अधिकारी अजय भिसे हे दोघेही या रक्तेपढीशी संलग्न आहेत. जेजे महानगर रक्तपेढीमधून तसेच या रक्तपेढीच्या नावे घेतलेल्या शिबिरांमधून रक्ताची चोरी करून हे रक्त बदलापूर येथील माया या खासगी रक्तपेढीमध्ये नेले जात होते. अशा ५५ रक्ताच्या पिशव्यांची चोरी सामाजिक वैद्यकीय अधिकारी अजय भिसे यांनी डॉ. हितेश पगारे यांच्या सांगण्यावरून कशी केली हे पुराव्यासहित ‘महाराष्ट्र टाइम्स’ने निदर्शनास आणून दिले.
एफडीएने त्याची गंभीर दखल घेत जेजे महानगर रक्तपेढीसह माया रक्तपेढीचीही झाडाझडती घेतली. जेजे महानगर रक्तपेढीप्रमाणे माया रक्तपेढीमध्येही अशाच गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. बदलापूर येथे रक्तदान शिबिरांतून संकलित केलेल्या रक्ताच्या वाहतुकीच्या नोंदी उपलब्ध नसणे, रक्तपिशव्यांच्या संकलनाच्या नोंदीमधील बदलापूर येथील माया रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिरांतून संकलित रक्ताच्या वाहतुकीच्या नोंदी उपलब्ध नसणे, या रक्तपिशव्या नेमक्या कुठे वापरण्यात आल्या यासंदर्भातील माहितीचा अभाव, रक्तसंक्रमण अधिकारी तसेच आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती,कालबाह्य उपकरणांचा वापर, गुणवत्ता नियंत्रण चाचण्यांचा अभाव, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील अनियमितता तसेच रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मंजुरी अशा अनेक गंभीर बाबी एफडीएला आढळल्या आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनेही एफडीएसोबत कारवाई केली होती.
या गंभीर त्रुटींमुळे रक्त व रक्तघटकांची सुरक्षितता, गुणवत्ता, शुद्धता आणि कार्यक्षमता यांच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून रक्तदाता व रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णहित लक्षात घेता एफडीएने माया रक्तपेढीला काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या रक्तेपढीचे रक्तसंकलन, रक्तघटक निर्मिती, परीक्षण, साठवणूक, वितरण, विक्री, रक्तदान शिबिरांचे आयोजन तसेच रक्तपेढीशी संबधित सर्व प्रकारचे कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तुकाराम मुंढेंनी काय इशारा दिला?
“औषधे व सौंदर्यप्रसाधने यांच्यासह रक्त ही जीवरक्षक बाब असून त्याचे संकलन, प्रक्रिया व वितरणामध्ये सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता, सुरक्षितता तसेच पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. रक्तदाता आणि रुग्णाच्या आरोग्याशी संबधित निष्काळजी अन्न व औषध प्रशासन सहन करणार नाही. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा