• Mon. Jun 29th, 2026
    Mayank Lohar Death Case : मुंबई मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुर्वणाला धारधार शस्त्र कुणी दिलं? प्रकरणात डिलिव्हरी बॉय मित्राची एन्ट्री

    Mumbai Local Mayank Lohar Murder Case : मुंबई लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मयंक लोहारने लहान वयातच घराची जबाबदारी स्वीकारली होती आणि तो अंधेरीतील एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. तो कुटुंबाचा मुख्य आधार होता.

    मुंबई लोकल मयंक लोहार हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन एका निष्पाप तरुणासाठी मृत्यूचा सापळा बनेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. 22 वर्षीय मयंक लोहारची धावत्या ट्रेनमध्ये निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या करण्यात आली. डब्यात पावसाचं पाणी शिरत असल्यानं दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादानंतर ही घटना घडली. त्याच्या मृत्यूने विरारमधील लोहार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात दुःख आणि संतापाची लाट पसरली आहे. मयंक लोहार विरारमधील जीवदानी रोडवरील अमरनाथ बिल्डिंगमध्ये आपल्या आई-वडील, भाऊ आणि लहान बहिणीसोबत राहत होता.

    रोशनला त्याच्या मित्राने दिला होता सुरा

    चर्चगेट-बोरिवली फास्ट लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहारची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेत आता आरोपी रोशन सुर्वणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी रोशन सुर्वणाने घटनेत वापरेला सुरा त्याच्या मित्राकडून घेतला होता. रोशन सुर्वणाचा मित्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा त्याच्या एका ग्राहकाने कंपनीला रिटर्न केला होता. हाच रिटर्न केलेला सुरा मित्राने रोशन सुर्वणाला दिला होता. सुवर्णाने हा सुरा स्वत:च्या बॅगेत लपवून ठेवला होता. त्याच सुऱ्याने रोशन सुर्वणाने निष्पाप मयंक लोहारला संपवलं. दरम्यान, सुवर्णाने स्वत:सोबत सुरा का बाळगला?, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
    Maharashtra TimesRain Alert: पावसाने चिंता वाढवली; मुसळधार बरसण्यासाठी कधीपर्यंत वाट पाहावी लागणार? असा आहे पुढील दोन आठवड्यांसाठी IMD चा अंदाज

    लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी

    मयंकने लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून तो अंधेरीतील एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. तो कुटुंबाचा मुख्य आधार होता आणि दररोज कामावर ये-जा करण्यासाठी खडतर प्रवास करत असे. ही घटना मंगळवारी 23 जून रोजी रात्री जोगेश्वरी आणि मालाड दरम्यान घडली. जेव्हा तो नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत होता. आता मयंकच्या घरात भयाण शांतता पसरली आहे आणि अश्रूंचा पूर आला आहे.

    आईचा मन हेलावलणारा टाहो

    ज्या वडिलांनी आपल्या मुलाला मोठ्या कष्टाने वाढवले, ते आता पूर्णपणे खचले आहेत. मयंकचे वडील रमेश लोहार यांनी प्रशासनाकडे कठोर शिक्षेची मागणी केली आहे. आपले अश्रू आवरत त्यांनी मागणी केली की, इतर कोणत्याही मुलावर अशी भीषण दुर्घटना कधीही ओढवू नये. माझ्या निष्पाप मुलाचा जीव घेणाऱ्या निर्दयी आरोपीला फाशी देण्यात यावी. मयंकची आईसुद्धा आपल्या मुलाला गमावल्याने पूर्णपणे खचली आहे. ती म्हणाली की, मी माझा कमावता मुलगा गमावला आहे. आमचा आधारच नाहीसा झाला आहे. ती रडतच राहिली. तिच्या हृदयद्रावक किंकाळ्यांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हादरवून सोडले.
    Maharashtra TimesMira Road News : पार्क गाडीतील एअरबॅग अचानक उघडली, 25 वर्षीय तरुणाच्या मानेवर आघात, गाडीतच मृत्यूने गाठलं

    बहिणीचे डब्यामधील बघ्यांना सवाल

    लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादानंतर एका तरुण प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या झाल्याच्या घटनेमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या माणुसकी आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मयंकच्या धाकट्या बहिणीने डब्यामधील नागरिकांना प्रश्न विचारला आहे की, ‘जेव्हा माझ्या भावाला वारंवार चाकूने भोसकले जात होते, तेव्हा डब्यातील इतर लोक काय करत होते? त्याला वाचवण्यासाठी एकही प्रवासी पुढे का आला नाही?’ घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, लोकल ट्रेनच्या डब्यात सुमारे 30 प्रवासी होते.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा