• Fri. Jun 26th, 2026
    आम्ही म्हटलेलं सिया 19 वर्षांचीच, इतक्यात लग्न नको, पण ‘ते’ मागे लागले; बाबांचा वेगळाच दावा; तिची 10 वेळा पसंती विचारलेली!

    Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death : सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सांगितले की, लग्नाचा हा प्रस्ताव सर्वप्रथम गोव्यातील एका कौटुंबिक विवाह सोहळ्यादरम्यान आला होता

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : केतन अगरवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या पालकांनी पहिल्यांदाच खुलासा केला की, सिया आणि केतन यांचे लग्न कसे ठरले. सियाची वारंवार संमती घेऊन, केतनशी लग्न करण्याची तिची इच्छा असल्याची खात्री झाल्यानंतरच ही सोयरीक जुळवण्यात आली, असा दावा गोयल दाम्पत्याने केला.

    सियाचे वडील प्रवीण गोयल हे रुग्णालयात दाखल असून त्यांनी सांगितले की, लग्नाचा हा प्रस्ताव सर्वप्रथम गोव्यातील एका कौटुंबिक विवाह सोहळ्यादरम्यान आला होता. केतनच्या नातेवाईकांचे लक्ष सियाकडे गेले आणि त्यांनी तिच्याबद्दल विचारणा केली, असे ‘इंडिया टुडे’ने बातमीत म्हटले आहे. याआधी अगरवाल कुटुंबाने मात्र गोयल लग्नासाठी आमच्या मागे लागले होते, असे सांगितले होते.

    सियाला स्थळ आणलं, आमचा नकार

    “एका व्यक्तीने माझ्या भावाला विचारले की ती मुलगी कोणाची आहे. ती माझी मुलगी असल्याचे समजल्यावर त्यांनी लग्नाचा प्रस्ताव विचारात घेण्याचं सांगितलं. त्यावेळी आम्ही तो प्रस्ताव नाकारला, कारण सियाचे वय तेव्हा केवळ १९ वर्षे होते आणि तिचे लग्न करण्याची आम्हाला कोणतीही घाई नव्हती” असे प्रवीण गोयल यांनी सांगितले.
    Maharashtra TimesMira Road News : पार्क गाडीतील एअरबॅग अचानक उघडली, 25 वर्षीय तरुणाच्या मानेवर आघात, गाडीतच मृत्यूने गाठलं
    त्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांनंतर कर्जत येथे झालेल्या एका कौटुंबिक विवाह सोहळ्यात हा प्रस्ताव पुन्हा समोर आला आणि अमन अगरवाल यांनी या नातेसंबंधाबाबत पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त केली.

    मोठ्या भावंडांच्या लग्नानंतर सियाचा विवाह लावा

    “माझ्या मेहुण्याने त्यांना सांगितले की सिया अजून लहान आहे; पण अमन अगरवाल यांनी सुचवले की, दोन्ही कुटुंबे आधी मोठ्या भावंडांचे लग्न उरकून घेऊ शकतात आणि त्यानंतर सियाच्या लग्नाचा विचार करु शकतात. केतन चांगल्या कुटुंबातील आहे असे सांगून त्यांनी आम्हाला या प्रस्तावाचा विचार करण्यास सांगितले” असे गोयल म्हणाले.
    Maharashtra TimesBadlapur Crime : प्राजक्ता हार्ट अटॅकने गेली, बदलापुरात नवऱ्याचा बनाव, गर्लफ्रेण्डचं गुपित फुटलं अन् अडीच महिन्याने धक्कादायक उलगडा
    प्रवीण गोयल यांनी सांगितले की, घरी परतल्यावर त्यांच्या बहिणीने या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला. सिया अजून खूप लहान आहे आणि आपल्याला आधी आपल्या मुलाचे लग्न करायचे आहे असे त्यांना सुरुवातीला वाटत होते; तरीही, अगरवाल कुटुंबाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन या प्रस्तावाचा विचार करावा, असे नातेवाईकांनी त्यांना पटवून दिले.

    “त्यांनी मला सांगितले की हे एक प्रतिष्ठित कुटुंब आहे आणि असे प्रस्ताव वारंवार येत नाहीत. मी त्यांना सांगितले की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी माझी पत्नी पूजा हिच्याशी यावर चर्चा करेन,” असे ते म्हणाले. घरी या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर, हे नाते पुढे नेण्यास कुटुंब अखेरीस सहमत झाले. पूजा गोयल यांनी सांगितले की साखरपुडा निश्चित करण्यापूर्वी आम्ही सियाकडे वारंवार विचारणा केली होती.

    पंकजाताईंवर गरळ ओकणारे नेते नको; माजलगावात येऊन प्रीतम मुंडेंचा प्रकाश सोळंकेंवर निशाणा

    सियाला दहा वेळा विचारलं

    “आम्ही सियाला किमान दहा वेळा विचारले की तिला केतन आवडतो का आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे का. प्रत्येक वेळी तिने आम्हाला सांगितले, ‘हो, मला केतन आवडतो. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. माझे इतर कोणाशीही कोणतेही रिलेशनशीप नाही” असे सियाच्या आई म्हणाल्या.

    सियाची संमती मिळाल्यानंतरच हे लग्न ठरवण्यात आले होते आणि लग्नासाठी तिची इच्छा नसावी असे वाटण्यासारखे कोणतेही कारण नव्हते, असे तिच्या आईबाबांनी सांगितले.
    Maharashtra TimesCrime News : मैत्रिणीच्या भावाला 40 फोटो आणि 3 व्हिडिओ पाठवले, दोन कुटुंब धावत पोहोचली, गाडीमध्ये युगुलाचा गूढ अंत
    पुण्यातील लोहगड किल्ल्यावरुन दरीत ढकलून होणारा पती केतन अगरवाल याची हत्या करण्याचा कट सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचला होता, असा आरोप पोलिसांनी केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा