• Mon. Jun 29th, 2026
    Siya Goyal : केतन आवडत नव्हता तर कुटुंबाला का नाही सांगितलं? , पोलिसांच्या प्रश्नावर सिया गोयलचं थेट उत्तर, काय म्हणाली?

    Pune Ketan Agarwal Killed Case : पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या अटकेत असलेल्या सिया गोयलने, केतनची हत्या का केली? त्याचं उत्तर दिलं आहे.

    पुणे लोहगड केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : सध्या राज्यभरात तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. होणाऱ्या बायकोनेच म्हणजेच सिया गोयल हिने तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीसोबत आपल्या होणाऱ्या पतीचा काटा काढला. 18 जून रोजी लोहगडावरुन दोघांनी प्लॅन करुन केतनला 400 फूट खोल दरीत ढकललं, आणि त्याचा पाय घसरुन तो खाली पडल्याचा बनाव केला. पण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या घटनेचा उलगडा केला आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असताना चौकशीमध्ये मोठमोठे दावे, खुलासे आणि दोन्हीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याचदरम्यान, दोघांच्या चौकशीत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

    पोलिसांच्या प्रश्नावर सियाचं उत्तर

    केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटकेत असलेली आरोपी सिया गोयल हिला पोलिसांनी प्रश्न विचारला की, ‘तुला केतन अग्रवाल आवडत नव्हता तर कुटुंबाला का नाही सांगितलं? त्यावर सिया म्हणाली की, ‘मला कुटुंबाला दुखवायचं नव्हतं. कुटुंबीयांना दुखवू शकत नव्हते, त्याऐवजी केतनला संपवण्याचा कट सोपा होता आणि तो आम्ही रचला. ट्रेकिंगदरम्यान केतनचा दरीत पडून मृत्यू झाला, यावर संशय येणं अशक्य होतं. लोहगडावर सीसीटीव्ही कॅमेराही नव्हता’, असं धक्कादायक उत्तर सियाने पोलिसांना दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.

    Maharashtra TimesPune Crime : केतनला टक्कल, विग घालत असल्याने लग्नाची इच्छा उडाली, सियाचा नवीन दावा; लोहगड प्लॅन फेल झाल्यास पुढचा कटही शिजलेला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    लोहगड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ही घटना खरोखरच अनाकलनीय आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरच्या मुलांमध्ये अशी सूडबुद्धी का तयार होते? यामागे गुन्हेगारीसोबतच सामाजिक अँगल तपासला गेला पाहिजे.

    Maharashtra TimesJalgaon News : पावसामुळे दुचाकी शेतात रुतू नये म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न, आईच्या डोळ्यांदेखत लेकराचा वीज कोसळून अंत; शेतातच माऊलीचा आक्रोश

    पुणे नसरापूर प्रकरणावरही भाष्य

    नसरापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. येत्या 29 जून रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नसरापूर प्रकरण हे दुर्मिळ प्रकरण असून दोषीला शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे, ती मागणी न्यायालय मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे’. तसेच ‘न्यायालयाने सुट्टीच्या काळातही ही केस सुरू चालवली आणि विक्रमी वेळेत निकाल दिला. या केसमुळे पुन्हा अशा घटना घडल्या तर त्यामध्ये जलदगतीने शिक्षा मिळेल’, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा