Amalner Shahapur Youth Died by Lightning : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील शहापूर येथे एक मोठी हृदयद्रावक घटना घडली. वीज कोसळ्यानं एका 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
अमळनेर शहापूर वीज पडून तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे शेतात कापूस लागवडीचं काम करत असताना अंगावर अचानक वीज कोसळल्यानं एका तरुण शेतकऱ्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 23 जून रोजी दुपारी घडली. आईच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शहापूर गावावर शोककळा पसरली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेनं सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हवामानात अचानक बदल अन्…
राकेश रतिलाल पाटील (32, रा. शहापूर, ता. अमळनेर) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. राकेश पाटील हा शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणारा कष्टाळू आणि तरुण शेतकरी होता. कुटुंबाच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी त्याने सांभाळली होती. यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी तो गेल्या काही दिवसांपासून शेतातील कामांमध्ये राबत होता. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी 22 जून रोजी तालुक्यातील चांगला पाऊस झाल्यानं कपाशी लागवडीसाठी जमीन भुसभुशीत आणि पोषक वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी त्याने आपल्या आईसह काही महिला मजुरांना घेऊन शेतात कपाशी लागवडीचं काम सुरू केलं होतं. सकाळपासून वातावरण चांगलं होतं. दुपारच्या सुमारास मात्र अचानक हवामानात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. Nasrapur Case: गाठीशेव, आरोपीचा व्हिडिओ कॉल अन् नवा प्रयोग; नसरापूर प्रकरणात पोलिसांनी कसा मिळवला भक्कम पुरावा? त्याचवेळी शेतात उभी असलेली दुचाकी शेतातच रुतू नये म्हणूण सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी राकेश पाटील याने रस्त्याकडे धाव घेतली. दुचाकी हलविण्यासाठी तो रस्त्याच्या दिशेने जात असताना काही क्षणांतच वीज थेट त्याच्या अंगावर कोसळली. विजेचा जोरदार तडाखा बसल्यानं तो जागीच कोसळलं. ही संपूर्ण घटना त्याच्या आईसह शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांच्या डोळ्यासमोर घडली. मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याचं पाहताच आईने मदतीसाठी आक्रोश केला. तिचा हंबरडा ऐकून परिसरातील शेतकरी आणि नागरिक घटनास्थळी धावून आले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या राकेश पाटील याला तात्काळ उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. Siya Goyal : चेतन रडायला लागला, म्हणाला तुला जमणार नाही, मीच केतनला ढकलतो, सियाचा दावा; एकमेकांवर दोषारोप सुरुच
कुटुंबाचा आधावड हरपला
गावातील सामाजिक उपक्रमांमध्येही त्याचा सहभाग असायचा. त्यामुळे त्याच्या अकाली निधनाने शहापूरसह परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. राकेश पाटील याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाचा आधारवड हरपल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा