Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death : १४ जून रोजी सियाने एकटीने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरल्याचे चौकशीत समोर आले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, १४ जून रोजी त्याला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून देण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्या वेळी सियाला एकटीला त्याला ढकलण्यात यश आले नाही. त्यामुळे चार दिवसांनी १८ जून रोजी पुन्हा कट रचून प्रियकर चेतन चौधरीला घटनास्थळी बोलावण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
सियाकडूनच कटाचे नियोजन
या संपूर्ण कटाचे नियोजन सिया हिनेच केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, केतन अग्रवाल खून प्रकरणाचा अत्यंत सखोल तपास सुरू असून, आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलिस कोठडीत कसून चौकशी करण्यात येत आहे. तपासादरम्यान १४ जून रोजी सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अयशस्वी ठरल्याचे समोर आले आहे. Mumbai Local Crime : वाद टाळा, शांतता पाळा; कुटुंबीयांचे प्रवाशांना सल्ले, सलगच्या दोन भयावह घटनांनंतर मुंबईकरांचे प्राण कंठाशी
दोघांनी मिळून दरीत ढकललं
तपासानुसार, पहिला प्रयत्न फसल्यानंतर १८ जून रोजी पुन्हा नियोजन करण्यात आले. या वेळी चेतन चौधरीला लोहगडावर बोलावण्यात आले आणि त्यानंतर दोघांनी मिळून केतनला दरीत ढकलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण कटाची आखणी सियाने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
VIDEO | बच्चू कडू आणि दरेकरांमध्ये सभागृहात हमरीतुमरी
केतन अगरवालच्या मृत्यूनंतर सुरुवातीला हा अपघात असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अग्रवाल कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी विविध तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे तपासून प्रकरणाचा छडा लावला. आरोपींनी पोलिसांना संशय येऊ नये यासाठी नियोजनपूर्वक हालचाली केल्याचाही तपासात दावा करण्यात आला आहे. Ketan Agarwal : पूर्ण चौकशीविना लग्न लावू नका, केतनच्या आजोबांकडून भीती व्यक्त; सियाच्या विवाहाची घाई का करताय? गोयलांना दोन ऑप्शन दिलेले
चौकशीला बोलावणे म्हणजे ताब्यात घेणे नाही
‘आरोपींविरुद्ध जास्तीत जास्त भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. अनेक व्यक्तींची चौकशी सुरू असून, ती केवळ तपासाच्या अनुषंगाने माहिती मिळविण्यासाठी केली जात आहे. चौकशीसाठी बोलावणे म्हणजे संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले, असा अर्थ काढू नये,’ असेही गील यांनी स्पष्ट केले; तसेच हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने अपुऱ्या माहितीच्या आधारे तर्क-वितर्क मांडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा