येत्या रविवारी मध्य रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकच्या कालावधीत ट्रान्स-हार्बर मार्ग तब्बल 5 तास बंद राहणार आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरही काही स्थानिकांवर लोकल ट्रेन थांबणार नाही.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : येत्या रविवारी नेहमीप्रमाणे मध्य रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करुन याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. येत्या रविवारी 28 जूनला मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. तर ट्रान्स-हार्बर मार्ग तब्बल 5 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडताना लोकल ट्रेनचं वेळापत्रक बघणं जास्त आवश्यक आहे. येत्या रविवारी कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी मुंबईला किंवा मुंबईहून नवी मुंबई किंवा इतर ठिकणी रेल्वेने प्रवाश करणाऱ्या प्रवाशांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 28 जूनला मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, असं मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा कालावधी
माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाउन’ धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 03.32 या वेळेत सुटणाऱ्या ‘डाउन’ धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावर वळवल्या जातील.
‘डाऊन’ मार्गावर लोकल कुठे थांबणार आणि कुठे थांबणार नाहीत?
या सर्व गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा ‘डाऊन’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. याचाच अर्थ या गाड्या विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत.
‘अप’ मार्गावरील गाड्या वळवण्यात येतील
ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 03.51 या वेळेत सुटणाऱ्या ‘अप’ धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड स्थानकावर ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा येथे पुन्हा ‘अप’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. या गाड्या सुद्धा विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत येणाऱ्या किंवा तिथून सुटणाऱ्या सर्व ‘अप’ आणि ‘डाउन’ लोकल गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
ट्रान्स-हार्बर मार्गावर 5 तासांचा ब्लॉक
ट्रान्स-हार्बर मार्गावर तब्बल 5 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाउन’या दोन्ही बाजूने ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाउन’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत वाशी / नेरुळ / पनवेलकडे जाणाऱ्या ‘डाउन’ मार्गावरील सेवा आणि पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत ठाण्याकडे येणाऱ्या ‘अप’मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील.
पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा