• Sun. Jun 28th, 2026
    Ketan Agarwal Case: असलं कसलं प्रेम? सिया आणि प्रियकर चेतनमध्ये पोलीस कोठडीतच जुंपली; एकमेकांवर गंभीर आरोप, पोलीस कोठडीत काय घडलं?

    पुणे: लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल या २५ वर्षीय उद्योजक तरुणाचा जीव घेतल्याप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहे. केतनला मारण्याचा प्लॅन नक्की कोणी रचला होता, त्याला कशा पद्धतीने संपवण्यात आलं, याबाबत पोलिसांकडून दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. चेतन चौधरी या तरुणावर असलेल्या प्रेमामुळेच सिया गोयल हिने साखरपुड्यानंतर आपला होणारा पती केतन अगरवाल याचा जीव घेण्याचा क्रूर निर्णय घेतला. मात्र एकमेकांवरील प्रेमासाठी तिसऱ्या व्यक्तीचा जीव घेणारं हे प्रेमीयुगुल आता एकमेकांवरच गंभीर आरोप करू लागल्याचं पोलीस चौकशीतून उघड झालं आहे.

    तपास अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, असं मी सियाला सांगितल्याचा दावा चेतन चौधरी याने तपासादरम्यान केला आहे. मात्र तसं न करता केतनची हत्या करण्याचा प्लॅन सिया गोयल हिने आखल्याचा आरोप त्याने केला आहे. दुसरीकडे, केतनची हत्या करण्याचा प्लॅन माझा नव्हता, तर चेतन यानेच सगळा कट आखला होता, असं सियाकडून सांगण्यात येत आहे. तसंच केतन अगरवाल याचा खून करण्याचा पहिला प्रयत्न १४ जून रोजी फसल्यानंतर चेतन रडला होता, असंही तिने म्हटलं आहे.

    हत्या प्रकरणापासून स्वत:ला वेगळं करण्यासाठी आणि शिक्षेपासून बचाव करण्यासाठी सिया आणि चेतन एकमेकांकडे बोट दाखवू लागल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. “हत्येचा सूत्रधार नेमका कोण, हे कळू नये यासाठी दोघेही एकमेकांकडे बोट दाखवून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या दोघांनी मिळून केतन अगरवाल याला संपवण्याचा कट रचला, हे स्पष्ट करणारे अनेक पुरावे आमच्याकडे प्राप्त झाले आहेत. मला सियाला घेऊन पळून जायचं होतं, मात्र तिने केतनचा खून करण्याचा प्लॅन केला, असं चेतनचं म्हणणं आहे. तर केतनला ठार मारलं पाहिजे, अशी चेतनची इच्छा असल्याचा दावा सियाकडून केला जात आहे,” असं तपास अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत ‘हिंदुस्तान टाइम्स’ने वृत्त दिलं आहे.

    दरम्यान, केतन अगरवाल याच्या हत्येचा कट रचण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे ३१ मे ते ४ जून यादरम्यान एका कॅफेमध्ये भेटले असल्याचं समोर आलं असून या भेटीत त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती आम्ही मिळवत असल्याचंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed