Ketan Agarwal: केतन अग्रवालचा लोहगडावरुन खाली पडून शेवट झाला. या प्रकरणात पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया आणि प्रियकर चेतनला अटक केली आहे. दोघांची चौकशी सुरू आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालचा वयाच्या २४ व्या वर्षी पुण्यातील लोहगडावरुन पडून दुर्दैवी शेवट झाला. त्याचा मृत्यू अपघाती असल्याचं सुरुवातीला वाटत होतं. पण केतन सोबत घातपात झाल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जूनला केतनला कड्यावरुन खाली ढकललं. तब्बल ३५० फुटांवरुन पडल्यानं केतनचा मृत्यू झाला.
सेल्फी काढताना सोसाट्याचा वारा आला आणि केतन दरीत पडला, असा घटनाक्रम सियानं कथन केला होता. पण याबद्दल केतनच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला. केतन नियमितपणे ट्रेकिंगला जायचा. त्यामुळे त्याचा अशा प्रकारे मृत्यू होणं कुटुंबाला पटलं नाही. त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली. या तपासातून केतन सोबत घातपात झाल्याचं समोर आलं. यानंतर सिया आणि चेतनला अटक करण्यात आली. Pune News: वडिलांना सियाबद्दल सतत एकच प्रश्न; एकदा ‘ते’ नावही घेतलेलं; केतनला धोक्याची जाणीव झालेली? चेतनची पंचसुत्री, आली अंगाशी – लोहगडावर जात असताना चेतननं त्याचा मोबाईल पुण्यातील मार्केट रोड येथे असलेल्या त्याच्या दुकानात ठेवला होता. मोबाईलवर कॉल आल्यास ते उचला, अशी सूचना त्यानं कामगारांना दिली होती. गुन्हा घडला तेव्हा आपण कामावरच होतो, असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण पोलिसांनी त्या दिवशी चेतनला कॉल करणाऱ्या सगळ्यांशी संपर्क साधला. त्या सगळ्यांनी आम्ही चेतनच्या मोबाईलवर कॉल केल्याचं सांगितलं. कॉल उचलले गेले. पण आवाज चेतनचा नव्हता. त्याचे कर्मचारी आमच्याशी बोलले, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
– चेतननं त्याच्या मोबाईलमधील इंटरनेट सकाळी ७ ते संध्याकाळी ५.४० पर्यंत बंद ठेवलं. आपलं लोकेशन ट्रॅक होऊ नये याची काळजी त्यानं घेतली. पण चेतनच्या ऑफलाईन असण्यानं पोलिसांना संशय आला. केतनचा मृत्यू झाला त्याच दिवशी चेतनचं ऑफलाईन राहणं पोलिसांना खटकलं. Pune Crime: सियाचा विचित्र हट्ट, चाणाक्ष संजनाचे प्रश्न अन् चेतनची हुशारी अंगाशी; 5 चुकांमुळे सिया गजाआड – स्वत:चा मोबाईल दुकानात ठेवणारा चेतन त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मोबाईल लोहगडावर घेऊन गेला. ही माहिती तपासातून समोर आली. मग पोलिसांनी तो नंबर ट्रॅक केला. त्याचं लोकेशन १८ जूनला लोहगडावर आढळून आलं.
– गडावर जाताना त्यानं हुडी वापरली. तोंडावर मास्क लावला. कानावर हेडफोन लावले. आपला चेहरा दिसू नये याची पुरेपूर काळजी त्यानं घेतली. पण तब्बल ३३ अंश तापमानात हुडी घालून फिरणारा तरुण गडावर दिसल्यानं पोलिसांना त्याचा संशय आला.
– चेतननं गडावर जाताना तिकीट घेणंदेखील टाळलं. आपण व्यायाम करण्यासाठी जात आहोत, येताना तिकीट घेऊ असं सांगून तो गडावर गेला. गडावर गेल्याचा कोणताही पुरावा त्याला मागे सोडायचा नव्हता. पण यामुळे तो गडावरील सुरक्षा रक्षकाच्या विशेष लक्षात राहिला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा