Harihar Fort Advisory: दरवर्षी त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात पर्यटकांची हुल्लडबाजी होत असल्याने यंदा पावसाला सुरुवात होताच नाशिक पश्चिम वन विभागाने निर्बंध जारी केले.
उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या पथकांनी हद्दीत गस्त सुरू केली असून, पर्यटकांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
Pune Crime : तुमची सिया अगदीच विशीची आहे हो! अगरवाल कुटुंबाने सोयरीक नाकारलेली, गोयलांचा हट्ट, केतनचं लग्न कसं जुळलेलं?
त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील ब्रह्मगिरी, हरिहर गड, दुगारवाडी धबधबा आणि पहिने येथील ‘नेकलेस फॉल’ ही सर्व पर्यटनस्थळे मद्यपान निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कोणत्याही पर्यटकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास त्याला परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. यासह संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच स्थानिक सुरक्षारक्षक किंवा गाइड यांच्याशी हुज्जत घालणे किंवा गैरवर्तन करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
Eknath Shinde: विरोधकांना आणखी झटके बसणार! ‘ऑपरेशन टायगर’वरुन एकनाथ शिंदेंचे विधानसभेतून संकेत, काय म्हणाले?
७२ तासांपूर्वी नोंदणी
हरिहर गडावरील अत्यंत अवघड पायऱ्या आणि तेथे होणारी जीवघेणी गर्दी लक्षात घेता फक्त तीनशे पर्यटकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी दोन वाजेनंतर कोणालाही गडावर जाण्यास परवानगी नसेल. वीसपेक्षा जास्त जणांचा गट असल्यास त्यांना किमान ७२ तास (३ दिवस) अगोदर ९४२०३५२३९५ या क्रमांकावर अधिकृत नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी नसलेल्या गटाला प्रवेश नाकारण्यात येईल, असेही वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
पर्यटकांनी गडकिल्ले, धबधब्यांच्या ठिकाणी येण्यापूर्वी भौगोलिक माहिती घ्यावी. आवश्यक साधनसामग्री सोबत ठेवावी. नियमांबाबत प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे नोंदवण्यात येतील. -शेखर देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर
Pune Crime: प्री-वेडिंग शूट अन् पासपोर्ट ‘गायब’; केतनला लोहगडावर संपवणाऱ्या सियाचा आणखी एक कारनामा समोर
… असे आहेत नियम
– दुगारवाडी धबधबा, पहिने ‘नेकलेस फॉल’ येथे सकाळी ८ ते ४.३० पर्यंत प्रवेश
-गडकिल्ले, धबधब्यांजवळ सेल्फी काढणे, छायाचित्रे घेणे किंवा रील्स बनवण्यावर पूर्णपणे बंदी
-पर्यटनस्थळांवर ‘संयुक्त वन व्यवस्थापन समिती’ मार्फत शासन निर्णयानुसार अधिकृत शुल्क
-शुल्काबाबत कर्मचाऱ्यांशी कोणताही वाद घालू नये, असे वन विभागाचे आदेश
-अतिवृष्टी किंवा आपत्कालीन स्थितीत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटनस्थळ पूर्वसूचनेशिवाय बंद करण्याचे अधिकार राखीव
