• Fri. Jun 26th, 2026
    Sana Malik : तीन तलाकवरुन गदारोळ, सना मलिक यांच्याकडून कुराणचा उल्लेख, भातखळकर म्हणाले, देश संविधानावर चालतो

    भाजपच्या नेत्या तथा आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत तीन तलाक कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याबाबतची लक्षवेधी मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी भूमिका मांडली. यावेळी सभागृहात गोंधळ होताना बघायला मिळाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन तलाक कायद्याची महाराष्ट्रात अंमलबाजवणी करण्याबाबतची लक्षवेधी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधासभेत मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानातील कायद्याचा उल्लेख केला. पण याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी भूमिका मांडत असताना सभागृहात काहीसा गदारोळ होताना बघायला मिळाला. सना मलिक यांनी भूमिका मांडत असताना कुराणमधील कायद्यंचा उल्लेख केला आणि सभागृहात काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील हा देश कुराणवर नाही तर संविधानावर चालतो, असं म्हटलं.

    देवयानी फरांदे काय म्हणाल्या?

    “जो पाकिस्तान आमच्या भारत देशातून वेगळा झाला, त्या पाकिस्तानाचा आम्ही आज विचार केला, त्या ठिकाणी कुणाला बहुविवाह करायचा असेल तर त्याला पहिल्या पत्नीची लेख परवानगी घ्यावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये आरबिटरी काउन्सिल तयार करण्यात आलेलं आहे. या आरबिटरी काउन्सिलच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला विवाह करायला परवानगी आहे की नाही? याबाबत निकाल दिला जातो. भारत आणि पाकिस्तान 1947 मध्ये वेगळा झाला. पाकिस्तानात पॉलिगॅमीचे प्रमाण केवळ 1 टक्का आहे. माझ्याकडे दीड महिन्यात तीन ट्रिपल तलाकच्या केस आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी योग्य कारवाई केली आहे”, असं देवयानी फरांदे म्हणाल्या.

    सना मलिक काय म्हणाल्या?

    “माझ्या सहकारी देवयानी फरांदे यांनी या लक्षवेधीत मुस्लीम महिलांवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मला सभागृहात एकच प्रश्न विचारलायचा आहे की, या अशाप्रकारचा अत्याचार केवळ मुस्लीम महिलांवर होत आहे का? मी हा प्रश्न विचारु शकते का? याचं उत्तर मला दिलं जाऊ शकतं का?”, असे सवाल सना मलिक यांनी केले.

    “पॉलिगॅमीला मुस्लीम कायद्यानुसार मुस्लीम समाजात परवानगी आहे. पाकिस्तानने नवीन असं काही केलेलं नाही. पाकिस्तानने मुस्लीम लॉ, जे आमचं कुराण सांगतं, त्याला अंमलात आणलं आहे. तोच कायदा इथे अंमलात आणला गेला तर आमच्यापैकी कुणालाही, इस्लाममध्ये जे कुराण सांगतं तेच आम्ही फॉलो करतो. कुराणमध्ये काही गोष्ट सांगितली गेली आहे, ते फॉलो करण्यासाठी पाकिस्तान सरकारने कायदा आणला आहे. तर भारत देशाने देखील तसा कायदा आणावा. आम्ही तशी मागणी करत आहोत”, अशी भूमिका सना मलिक यांनी मांडली.

    सना मलिक ट्रिपल तलाक बद्दल नेमकं काय म्हणाल्या?

    “दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिपल तलाक. तलाकचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसन आणि तलाक-ए-बिद्दत असे तीन प्रकार आहेत. तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसन हे दोन तलाक आम्ही फॉलो करतो. तलाक-ए-बिद्दत ही सांस्कृतिक पद्धत आहे, जी प्रथा अनेक वर्षांपासून पिढ्यान पिढ्या चालत आलेली त्याबाबत कुठेही उल्लेख नाही”, असं सना मलिक म्हणाल्या.

    “जेव्हा इन्स्टंट ट्रिपल तलाकला रद्द करण्यात आलं, त्याबाबत कायदा आणण्यात आला, पण जी गोष्ट आमच्याकडे आहेच नाही, त्याला रद्द करण्यात आलं आहे. जर तसा प्रकार फॉलो केला जात असेल आणि त्याच्या विरोधात कुणी जात असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आवाज उचलत नाही. याउलट आम्ही त्याला फॉलो करतो”, असं सना मलिक यांनी स्पष्ट केलं.

    सना मलिक यांचं पॉलिगॅमीवर (एकापेक्षा जास्त पत्नी करणं) भाष्य

    “तिसरी गोष्ट म्हणजे पॉलिगॅमीची केवळ मुस्लीम समाजात परवानगी आहे? केवळ मुस्लीमच पॉलिगॅम करत आहेत का? मुस्लीम पुरुषच पॉलिगॅमी करत आहेत का? दुसऱ्या धर्माचे पुरुष पॉलिगॅमी करत नाहीत का? होत आहे. पॉलिगॅमीचे नियम फॉलो होत आहेत तर पाकिस्तानचा रेफरन्स दिला जाऊ नये. इस्लाममध्ये कुराणचा रेफरन्स दिला जावा. त्यालाच अंमलात आणलं जावं”, अशी भूमिका सना मलिक यांनी मांडली.

    “पॉलिगॅमी केवळ एका धर्मात होत नाही तर प्रत्येक धर्मात होत आहे. मुस्लीमांमध्ये पॉलिगॅमीची पद्धत सांगण्यात आली आहे आणि तेच फॉल केलं जावं. त्यासाठी कायदा आणला जावा”, अशी मागणी सना मलिक यांनी केली. सना मलिक यांच्या या भूमिकेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भूमिका मांडली.

    अतुल भातखळकर काय म्हणाले?

    “लक्षवेधी ही ट्रिपल तलाकच्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, याकरता आहे. सन्मानीय सदस्य, कुराण, पाकिस्तान, मुस्लीम धर्मातील परंपरा याचं लेक्चर देत आहेत. ते लेक्चर ऐकायची गरज नाही. हा देश संविधानाने चालतो. कुराणने चालणार नाही”, असं आमदार अतुल भातखळकर म्हणाले. यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भूमिका मांडली.

    योगेश कदम काय म्हणाले?

    “देवयानी फरांदे यांनी जो उल्लेख केला, त्यावर सना मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला की, हा प्रश्न केवळ मुस्लीम धर्मापुरता मर्यादीत आहे का? पण माझ्या नजरेस तरी ट्रिपल तलाकच्या तक्रारी अन्य कुठल्या धर्माच्या प्रतिनिधींकडून आलेल्या नाहीत. ट्रिपल तलाक ही पद्धत काही विशिष्ट समाजात आहेत. तिकडून त्या तक्रारी येत आहेत. पण कायदा तयार करत असताना आपण कुठल्याही विशेष्ट धर्मासाठी तयार करत नाहीत तर तो सगळ्यांना लागू होतो”, असं योगेश कदम म्हणाले.

    “केंद्राने कायदा काय पारित केलाय? तर मोबाईल मेसेज पाहून तलाक द्यायचा, ई-मेल मेसेज पाहून तलाक द्यायचा, फोनवरुन संभाषण करुन तलाक द्यायचा. तो अन्यायकारक होता म्हणून कायदा तयार केला गेला. त्याची अंमलबजावणी राज्यात व्हावी म्हणून आपण करतोय”, असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं.

    “ज्यावेळी UCG लागू होईल तेव्हा तो कायदा प्रत्येकाला लागू होणार आहे. त्यामुळे पॉलिगॅमीबाबत सना ताई आपण निश्चित राहावं. कुठल्याही एका धर्मपंथींना टार्गेट करण्यासाठी आपण कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. हा कायदा सर्वांसाठी लागू होईल”, असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा