• Fri. Jun 26th, 2026

    Beed News : विलास घुले हत्याप्रकरण विधानसभेत; धनंजय मुंडेंची ‘मास्टरमाईंड’ शोधण्याची मागणी, पंकजा मुंडेंनीही घेतली भूमिका, काय आहे सर्व प्रकरण?

    Beed News : विलास घुले हत्याप्रकरण विधानसभेत; धनंजय मुंडेंची ‘मास्टरमाईंड’ शोधण्याची मागणी, पंकजा मुंडेंनीही घेतली भूमिका, काय आहे सर्व प्रकरण?

    Dhananjay Munde On Vilas Ghule Case : विलास घुले हत्या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणाचे पडसाद थेट विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात दिसले. या कटाचा सूत्रधार कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बीड : केज तालुक्यातील विलास घुले हत्याप्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळात उमटले. या प्रकरणात पोलिसांनी केवळ प्रत्यक्ष आरोपींपर्यंत न थांबता कटाचा सूत्रधार कोण आहे, याचाही शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली. तर, मंत्री पंकजा मुंडे यांनीही या घटनेला अत्यंत दुर्दैवी संबोधत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका स्पष्ट केली. केजमध्ये २० जूनच्या रात्री घडलेल्या घटनेत एका व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी रचलेल्या कटादरम्यान विलास घुले यांचा जीव गेला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर हल्लेखोरांनी वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमागे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

    घुले कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी केज शहरात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून पोलिसांनी या प्रकरणातील सर्व धागेदोरे तपासून खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे, अशी मागणी त्यांनी केली.

    अजूनही अंत्यसंस्कार नाहीत

    घटनेनंतर चार दिवस उलटूनही घुले कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. आरोपींना अटक आणि संपूर्ण कटाचा उलगडा करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी केज बंदची हाक दिली असून विविध ठिकाणी आंदोलन आणि रास्ता रोको सुरू आहे.

    Maharashtra TimesOmraje Nimbalkar : मी 100 टक्के निधी खर्च केला! खासदार निधीवरील आरोपांना ओमराजे निंबाळकरांचं सविस्तर उत्तर, म्हणाले, ’18 कोटींमध्ये…’

    या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी विधानसभेत पोलिसांना सर्व बाजूंनी निष्पक्ष तपासाचे निर्देश देण्याची मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची दखल घेत गृह विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.

    पंकजा मुंडेंनी घेतली माहिती

    दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. विलास घुले यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी असून त्यांचा या वादाशी थेट संबंध नसताना त्यांना जीव गमवावा लागला, असे त्या म्हणाल्या. दोषींना कोणत्याही दबावाशिवाय शिक्षा व्हावी आणि तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा, अशा सूचना पोलिस प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करत घुले कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा