PMP New Buses: पुण्यात प्रवाशांची वाढती संख्या हाताळण्यासाठी नव्या बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या बस ताफ्यात दाखल होणार असून त्यांच्यासाठी १०० एकर जागेची गरज आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात (पीएमपी) नव्याने १६९३ बस डिसेंबर अखेरपर्यंत दाखल होणार आहेत. त्यासाठी पीएमपीकडून डेपो आणि पार्किंगसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पीएमआरडीए’कडे वेगवेगळ्या ४९ ठिकाणी १०० एकर जागेची मागणी आहे. त्याबाबतची माहिती ‘पीएमपी’ अध्यक्षांनी नगरविकास व परिवहन राज्यमंत्र्यांना गुरुवारी (१८ जून) दिली.
नव्या बस येणार
‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या एक हजार ९२५ बस आहेत. त्यापैकी एक हजार ८०० बसच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत प्रवासी सेवा दिली जाते; परंतु सध्या उपलब्ध असलेल्या बस प्रवासी सेवेला कमी पडत आहेत. त्यामुळे नव्या बस घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्या बस दाखल होण्यास सुरुवात होईल.
Pune News: पुणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, रेल्वेखाली भुयारी मार्ग आणि वर उड्डाणपूल बांधणार; शहराला मोठा फायदा
खरेदीची प्रक्रिया पूर्ण
सध्या दोन्ही महापालिकांनी व ‘पीएमआरडीए’ने दिलेल्या पैशांतून ‘पीएमपी’कडून एक हजार स्वमालकीच्या बसची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या बस ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत; तसेच भाडेतत्त्वावरील ६९३ बसदेखील डिसेंबरपर्यंत दाखल होतील. याशिवाय ‘पीएम ई-ड्राइव्ह उपक्रमा’त ‘पीएमपी’ने एक हजार बसची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या बस मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भविष्यात ‘पीएमपी’कडे बसचा ताफा वाढणार आहे; परंतु यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे जागेचा शोध सुरू आहे. यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरएडी’च्या हद्दीत १०० एकर जागेची मागणी केली आहे.
Pune ST Bus: पुणे विभागात एसटीचे उत्पन्न वाढले! बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कारवाई; १५ दिवसांत ५ कोटी रुपयांची वाढ
प्रवासी सेवा विस्तारणार
नव्याने दाखल होणाऱ्या बस पार्किंगसाठी आणि डेपोसाठी ‘पीएमपी’कडे पुरेशी जागा नाही. सध्याची जागा अपुरी असल्याने भर रस्त्यावर बस पार्क कराव्या लागतात; तसेच ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत बसची सेवा वाढवली आहे; पण त्या भागात पुरेसे डेपो नाहीत. त्यामुळे ‘पीएमपी’ने आत्ताच डेपो व बस पार्किंगसाठी जागा शोधल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील जागांची मागणी महापालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. नव्या बस दाखल झाल्यावर ‘पीएमपी’ची सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांबरोबर ग्रामीण भागातील सेवा वाढविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन ‘पीएमपी’कडून करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा