• Fri. Sep 4th, 2026

खासदारफूटी, पेपरफूटी ते कर्जमाफी; पावसाळी अधिवेशन तापणार, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

खासदारफूटी, पेपरफूटी ते कर्जमाफी; पावसाळी अधिवेशन तापणार, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

६ खासदारांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षात झालेल्या उलथापालथेनंतर आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. सोमवार २२ जूनपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून परंपरेनुसार चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानुसार विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं. मात्र यावेळीही विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेत अपात्र करण्यात आलेला महिलांचा मुद्दा ते नीट परीक्षा घोटाळा अशा महत्त्वाच्या मुद्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारसोबत चहा पिणं शक्य नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed