• Sat. Jun 20th, 2026

    राज्यपालांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 20, 2026
    राज्यपालांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस – महासंवाद

    ??????????????

    मुंबई, दि. २० : सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे रायगड जिल्ह्यातील रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिराला स्कुलबस देण्यात आली आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ही स्कुलबस लोकभवन येथे शिक्षण संस्थेला विधिवत देण्यात आली.

    कार्यक्रमाला सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टचे विश्वस्त मनीष रुपाणी, नाना पालकर स्मृती समितीचे पदाधिकारी कृष्णा महाडिक, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे मानद सचिव डॉ निलेश रेवगडे, तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    ??????????????

    रायगड जिल्ह्यातील रातवड येथील शाळा आठ गावांमधील तसेच ४ आदिवासी पाड्यांमधील १९६ मुलामुलींना शिक्षण देत असून स्कूलबस सेवेमुळे शाळेतील पटसंख्या ४२ विद्यार्थ्यांनी वाढली असल्याचे सांगण्यात आले.   सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे आजवर ९ स्कुलबस देण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रमेश तुलसियानी व सुमन तुलसियानी यांचे १५ दिवसांच्या अंतरानी अलीकडेच निधन झाले. परंतु त्यांच्या ट्रस्टतर्फे आजही सेवाकार्य सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed