Traveling without ticket penalty: रेल्वे प्रवासाबाबत रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी दंडाबाबत आता रेल्वेप्रशासनाने कठोर पाऊल टाकले आहे. रेल्वेने घेतलेला हा निर्णय काय आहे? सर्व काही समजून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात भारतीय रेल्वेने कठोर पाऊल उचलले असून आजपासून (२० जून २०२६) दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे. केंद्र सरकारच्या ‘जन विश्वास कायदा २०२६’ अंतर्गत रेल्वे कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे कायदा १९८९ मधील कलम १३७ आणि १३८ मध्ये सुधारणा करून विनातिकीट प्रवासासाठी आकारला जाणारा किमान दंड २५० रुपयांवरून थेट ५०० रुपये करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत १९ जून रोजी अधिसूचना जारी केली असून नव्या नियमांची अंमलबजावणी २० जूनपासून सुरू झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मे महिन्यातच सुमारे ४.९६ लाख विनातिकीट प्रवाशांकडून ४०.८५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यामुळे रेल्वे प्रशासनाने नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला.
तिकीट नसल्यास कोणती कारवाई?
नव्या नियमांनुसार वैध तिकीट किंवा पास नसताना रेल्वे प्रवास करणे, वापरलेले तिकीट पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करणे अथवा फसवणुकीच्या उद्देशाने प्रवास करणे हा गंभीर नियमभंग मानला जाणार आहे. अशा प्रकारे पकडलेल्या प्रवाशांकडून प्रवासाचे पूर्ण भाडे आणि त्याच रकमेइतका अतिरिक्त दंड वसूल केला जाईल. मात्र हा अतिरिक्त दंड किमान ५०० रुपये असणार आहे. प्रवाशाने नेमका कुठून प्रवास सुरू केला हे स्पष्ट नसल्यास संबंधित रेल्वेगाडीच्या प्रारंभ स्थानकापासूनचे भाडे आकारले जाईल. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना अधिक रक्कम मोजावी लागू शकते.
Omraje Nimbalkar: मोठा ट्विस्ट! माझा शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झालेला नाही; ओमराजे माघारी फिरल्यास ५ बंडखोर खासदारांचा गेम होणार!
दंड न भरल्यास तुरुंगवासाची तरतूद
रेल्वे अधिकाऱ्यांनी आकारलेला दंड किंवा भाडे भरण्यास नकार दिल्यास प्रकरण न्यायालयात जाऊ शकते. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही रक्कम जमा न केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास, ५०० रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र सुनावण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा आता विनातिकीट प्रवासाचा दंड पूर्वीपेक्षा अधिक मोजावा लागणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा