• Thu. Jun 18th, 2026

    Crime News: लग्नानंतर नवऱ्याचे दुसऱ्या तरुणीशी संबंध, पत्नीने जाब विचारताच सासूकडून साप सोडण्याची धमकी, नणंदेने लग्नातच केली मारहाण

    Crime News: लग्नानंतर नवऱ्याचे दुसऱ्या तरुणीशी संबंध, पत्नीने जाब विचारताच सासूकडून साप सोडण्याची धमकी, नणंदेने लग्नातच केली मारहाण

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर सासरच्या मंडळींना जाब विचारणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. विवाहितेने छळाला कंटाळून घर सोडून जावे, यासाठी तिच्या सासूने चक्क ‘घरात जिवंत साप आणून सोडेन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पती आणि सासूसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मनोज गायकवाड (पती), रेखा गायकवाड (सासू), राजेश गायकवाड (सासरे) आणि अस्मिता (नणंद) अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा विवाह ऑक्टोबर २०२२ मध्ये मनोज गायकवाड याच्याशी झाला होता. लग्नाचे काही महिने चांगले गेल्यानंतर, पती मनोज याचे दुसऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण पत्नीला लागली. माहिती घेतली असता पत्नीच्या संशय खरा ठरला. संतापलेल्या पीडितेने आपल्या संसाराचा विचार करून पतीला याबाबत जाब विचारला. मात्र, चूक सुधारण्याऐवजी पती मनोज आणि सासू रेखा यांनी तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

    स्कॉलरशिपचे पैसे ओरबाडले, सासूने दिली सापाची धमकी!

    पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या लोकांनी नवीन घर बांधण्याच्या बहाण्याने विवाहितेकडे माहेरहून १ लाख रुपये आणण्याची मागणी लावून धरली होती. पैसे आणत नसल्याने तिला उपाशी ठेवून मानसिक त्रास दिला जात होता. क्रूरतेची हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा विवाहितेच्या बँक खात्यात आलेली ७० हजार रुपयांची स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) सासरच्यांनी एटीएमद्वारे परस्पर काढून घेतली. तरीही विवाहिता घर सोडत नसल्याचे पाहून सासू रेखा हिने “घरातून निघून जा, नाहीतर थेट साप आणून सोडेन,” अशी विकृत धमकी दिली.

    भर लग्नात नणंदेने बेदम मारहाण

    हा छळ केवळ घरापुरता मर्यादित राहिला नाही. १२ मे रोजी चिकलठाणा येथील एका लग्नसोहळ्यात विवाहिता गेली असता, तिथे तिची नणंद अस्मिता हिने सर्वांसमोर तिला जाहीरपणे बेदम मारहाण केली आणि तिच्या कडेवरील लहान मुलाला बळजबरीने ओढून नेले, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed