• Thu. Jun 18th, 2026

    Tukaram Mundhe यांच्या अधिकाऱ्यांची मुंबईत दोन ठिकाणी धाडी, चिली आणि सोया सॉस जप्त; एनर्जी ड्रिंकच्या विरोधातही कारवाई

    Tukaram Mundhe यांच्या अधिकाऱ्यांची मुंबईत दोन ठिकाणी धाडी, चिली आणि सोया सॉस जप्त; एनर्जी ड्रिंकच्या विरोधातही कारवाई

    अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील धारावी आणि साकीनाका या दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एक कारवाई सॉस उत्पादकाच्या विरोधात तर दुसरी कारवाई ही एनर्जी ड्रिंकच्या विरोधात करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून IAS तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाईंचा धडाका सुरु आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुंबईच्या साकीनाका आणि धारावी परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत सॉस उत्पादकांवर कारवाई करण्यात आली. तर दुसरी कारवाई ही एनर्जी ड्रिंकच्या उत्पादनावर करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनाने मंगळवारी (16 जून) मुंबईच्या साकीनाका येथील मे. रती एंटरप्राइजेस, एस. जी. के मंजिल, मोहिली व्हिलेज, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई-७२ या सॉस उत्पादन करणाऱ्या आस्थापनेची तपासणी केली. या तपासणीत उत्पादन प्रक्रियेतील अटींचे पालन होत नसल्याचे, उत्पादनावरील लेबलिंगमध्ये विविध त्रुटी असल्याचे तसेच उत्पादीत अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि भेसळीबाबत संशय निर्माण करणाऱ्या बाबी निदर्शनास आल्या. त्याअनुषंगे चिली सॉस आणि सोया सॉस या उत्पादनांचा एकूण २५१० लिटर साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किमत ३२,६३० रुपये इतकी आहे.

    सदर उत्पादनांचे अधिकृत नमुने घेण्यात आले असून ते पुढील विश्लेषणसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अन्वये आवश्यक ती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सदर आस्थापनेतील तुटींचे गांभीर्य लक्षात घेता आस्थापनेस पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

    Energy Drink वरील कारवाई

    अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत निकृष्ट व नियमबाह्य अन्नपदार्थांच्या विक्री व वितरणाविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 15 जूनला मे. रियांश एंटरप्रायझेस, दुकान क्र. बी-१६०, प्रेमनगर, धारावी डेपो, मुंबई ४०००२२ या घाऊक विक्रेत्याच्या आस्थापनेवर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान “Cloud Nine Energy Drink Classic, 250 ml” या उत्पादनाचा साठा अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग व प्रदर्शन) विनियम, 2020 मधील तरतुदींचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आल्याने अंदाजे 1,19,040 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. सदर उत्पादनाचा अधिकृत नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत उपलब्ध साठा जप्त करण्यात आला आहे.

    उत्पादनाच्या लेबलवर अनेक लेबलिंग विषयक तुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. सदर उत्पादनाच्या लेबलवर एकूण साखरेच्या (Total Sugars) खाली अतिरिक्त साखरेचे (Added Sugar) प्रमाण घोषित करण्यात आलेले नव्हते, जे अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग व प्रदर्शन) विनियम, २०२० नुसार अनिवार्य आहे. तसेच, जीवनसत्त्वे (Vitamins) यांसारख्या पोषक घटकांची माहिती शिफारस केलेल्या दैनिक आहार भत्त्याच्या (Recommended Dietary Allowance – RDA) टक्केवारीच्या स्वरूपात दर्शविण्यात आलेली नव्हती, जे लागू विनियमांनुसार बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित उत्पादनाबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा