Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीवरून राजकीय वातावरण तापले आहे.
कोणतेही संविधानिक अथवा प्रशासकीय पद नसताना सोमय्यांनी मनपाच्या कामकाजात केलेला हस्तक्षेप आणि पालिका प्रशासनाची त्याला लाभलेली मूकसंमती, याविरोधात अमरावती शहर काँग्रेस कमिटीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना पार पडलेल्या या बैठकीमुळे मनपा प्रशासन कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Vidhan Parishad Election: रवी राणा-प्रवीण पोटे यांच्यात मनोमिलन; अमरावतीत ‘पॉवर गेम’, काँग्रेसमधील वाद कायम
जन्म-मृत्यू दाखल्यांच्या संवेदनशील विषयाचे भांडवल करून शहरात राजकीय वातावरण गढूळ करण्याचा हा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी केला आहे. तर विधान परिषद निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठीच शासकीय यंत्रणेचा हा गैरवापर झाला आहे का? याची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी केली आहे. जर ही बैठक मनपा आयुक्त आणि महापौरांच्या संमतीने झाली असेल, तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Nashik News: ‘तू तिथं मी’… आधी लेक गेला, आता पतीच्या मृत्यूनंतर 2 तासांतच पत्नीनेही सोडला जीव; एकत्र निघाल्या अंत्ययात्रा
सोमय्यांना अधिकार कोणी दिला : खा. वानखडे
कोणतेही घटनात्मक किंवा प्रशासकीय पद नसताना किरीट सोमय्या यांनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतलीच कशी, असा थेट सवाल खासदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात १८ जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत असून सध्या आचारसंहिता लागू आहे. अशा संवेदनशील काळात शासकीय मुख्यालयात राजकीय बैठक घेणे हा निवडणूक नियमांचा उघड भंग आहे. याप्रकरणी वानखडे यांनी थेट राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून भाजप नेते किरीट सोमय्या, मनपा आयुक्त वर्षा लड्डा व संबंधित अधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
