• Sat. Jun 13th, 2026
    कॅबमध्ये ओळख, बदलापूरची विवाहिता आणि चालकाची बॉडी गाडीत सापडली, लहान मुलाने गाडीतून उतरुन नातेवाईकांना सांगताच हलकल्लोळ

    Badlapur Woman Cab Driver Death : चालकाने आधी महिलेची हत्या करून नंतर स्वतःवर वार करून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्युवेली गावाजवळ गुरुवारी दुपारी एक महिला आणि ॲपआधारित कॅब चालकाचे शव पार्क केलेल्या गाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृत महिलेचा तीन वर्षांचा मुलगा या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असून, चालकाने आपल्या आईवर चाकूने अनेक वार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे चालकाने आधी महिलेची हत्या करून नंतर स्वतःवर वार करून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत महिला काही महिन्यांपूर्वी घाटकोपरहून ओला कॅबने बदलापूरला जात असताना या दोघांचा परिचय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली

    लहान मुलगा महत्त्वाचा दुवा

    मृत महिला दोन वर्षांपासून कुटुंबासह बदलापूर येथे राहत होती. घरापासून सुमारे दीड किलोमीटरवर तिची बॉडी आढळली. घटनेवेळी गाडीत असलेल्या लहान मुलाने बाहेर पडून जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना कळवल्यानंतर ही घटना उजेडात आली. आईचा गाडीत मृत्यू झाल्याचे सांगत त्याने नातेवाईकांना गाडीपर्यंत आणले. त्यावेळी सर्वांना महिलेसोबत एका पुरुषाचेही पार्थिव दिसले. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
    Maharashtra TimesPunjab Doctor Death : पतीचे हॉस्पिटलमधील तरुणीशी संबंध, CCTV मध्ये नको ते दिसलं, सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरचा गूढ अंत

    कॅबमध्ये महिलेची चालकाशी ओळख

    महिलेसोबत मृतावस्थेत आढळलेल्या कॅब चालकाचे नाव गणेश शिंदे असून, तो घाटकोपर येथील रहिवासी होता. मृत महिला काही महिन्यांपूर्वी घाटकोपरहून ओला कॅबने बदलापूर येथे येत असताना या दोघांचा परिचय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलेचा पती घाटकोपर येथे चहाचे दुकान चालवतो, तर गणेशच्या आईचाही घाटकोपर येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. मात्र, हत्येच्या दिवशी दोघे घटनास्थळी एकत्र कसे पोहोचले व या घटनेमागील नेमके कारण काय, याचा उलगडा लगेचच होऊ शकला नाही.
    Maharashtra TimesLondon Marathi family Death : लंडनमध्ये मराठी परिवाराचा हृदयद्रावक अंत, एक आठवड्याआधी काय घडलेलं, शेजारी महिलेने सांगितलं पैंच्या घरातून अचानक ओरडण्याचे आवाज

    नातेवाईकांनाही दोघांचं नातं सांगता येईना

    दोघांच्या बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवले असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत अधिक तपशील हाती येईल, असे पोलिसांनी सांगितले. मुलासमोरच गणेशने महिलेवर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेचे गणेशही काय नाते आहे, हे तिच्या नातेवाईकांनाही सांगता आले नाही.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा