Assault Case: पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’, सामूहिक बलात्कार आणि खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही नराधम भावांना बेड्या ठोकल्या आहेत.
७ वीतील मुलीला नशेचं औषध पाजलं, बेशुद्ध होताच दोन भावांकडून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. काका आणि पुतण्याने मिळून सातवीत शिकणाऱ्या एका निष्पाप चिमुरडीला नशेचे औषध पाजले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितली. कृष्णा सोळुंके आणि किशोर सोळुंके अशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपी काका-पुतण्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपींची आधीपासून ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला एका रूमवर नेले. तिथे तिला शीतपेयातून किंवा अन्नातून नशेचे औषध पाजले. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर या दोन्ही नराधम भावांनी आळीपाळीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचार करताना या नराधमांनी चिमुरडीचे मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट केले. त्यानंतर हे व्हिडिओ मुलीच्या आत्याच्या मोबाईलवर पाठवून दिले. “जर आम्हाला पैसे दिले नाहीत, तर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुमच्या कुटुंबाची बदनामी करू,” अशी धमकी देत त्यांनी खंडणी मागण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे पीडितेचे कुटुंब पुरते हादरून गेले होते.
पीडित मुलीचे नातेवाईक जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याने त्यांनी सुरुवातीला तिथे धाव घेऊन तक्रार दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि टीव्ही सेंटर भागातील एका बारमधून या दोन्ही आरोपींना मद्यधुंद अवस्थेत रंगेहात ताब्यात घेतले. हा सर्व गुन्हा उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे जवाहरनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. या गंभीर प्रकरणात पोलीस आता पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा