Jalna Dindi Highway Crack : ज्या महामार्गावरुन पंढरीची वारी जाते, ज्या महामार्गाचा वापर धार्मिक वारीसाठी केला जातो. अशा महामार्गाला आता मोठ-मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या महामार्गासाठी करोडो रुपयांचा खर्च देखील करण्यात आला होता.
पंढरपूर वारीसाठी धार्मिक महामार्ग
वाटूर ते मांठा दिंडी महामार्गाचं काम काही वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी तसेच पंढरपूर वारीसाठी धार्मिक महामार्ग आहे तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र, रस्त्याचं काम पूर्ण होऊन फारसा कालावधी लोटलेला नसतानाही रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी या भेगा इतक्या रुंद झाल्या आहेत की, दुचाकी वाहनांचं संतुलन बिघडून दर तीन-चार दिवसाला छोटे-मोठे अपघात होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता प्रत्यक्षात रस्त्यावर तडे गेल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहेत. विशेषत दुचाकीस्वार आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या भेगांमुळे अधिक धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात या भेगांमध्ये पाणी साचल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Thane Old Man Assault VIDEO : ठीक आहात का? परप्रांतीय कॅब चालकाच्या मारहाणीत दुखापत, ठाण्यातील वृद्धाला राज ठाकरेंचा फोन
छोटे-मोठे अपघात होतात
या महामार्गावर यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. रस्त्यावरील भेगा, काही ठिकाणी असलेले खड्डे आणि वेगाने धावणारी वाहने यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता संपूर्ण रस्त्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनीही या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रस्त्यांची अशी अवस्था होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Crime News: ७ वीतील मुलीला नशेचं औषध पाजलं, बेशुद्ध होताच काका-पुतण्याकडून अत्याचार; नंतर व्हिडिओही बनवले, अखेर नराधमांना अटक
रस्त्याला भल्यामोठ्या भेगा
दरम्यान, संबंधित विभागाकडून या रस्त्याची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाटुर ते मांठा दिंडी महामार्गावरील भेगा तातडीने बुजवून रस्ता सुस्थितीत आणणे आवश्यक असल्याचे मत परिसरातून व्यक्त होत आहे. आता या सर्व बाबीकडे संबंधित विभाग किती गांभीर्याने लक्ष देतो व महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करतो का कारण अवघ्या काही दिवसांवर आता दिंड्यांना सुरुवात होणार आहे, आणि दिंडी मार्ग म्हणून प्रसिद्ध असलेला या दिंडी महामार्गाला तडे गेल्याने याची दुरुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
