• Sun. Jun 14th, 2026

    15 वर्षांची प्रतीक्षा, थाटात लग्न; पण नियतीचा अत्यंत क्रूर डाव, लग्नाच्या अवघ्या सातव्या दिवशी नवविवाहितेचा दुर्दैवी अंत

    15 वर्षांची प्रतीक्षा, थाटात लग्न; पण नियतीचा अत्यंत क्रूर डाव, लग्नाच्या अवघ्या सातव्या दिवशी नवविवाहितेचा दुर्दैवी अंत

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या सातव्या दिवशी नववधूचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे लिहिणार आणि खंडाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : खऱ्या प्रेमाचा विजय झाला, असं म्हणत ज्या दोन जिवांनी अवघ्या 7 दिवसांपूर्वी अग्निसाक्षीने जन्मभराची सोबतीची शपथ घेतली होती, त्यांच्यावर नियतीने असा काही घाला घातला की पाहणारेही सुन्न झाले आहेत. तब्बल १५ वर्षे एकमेकांवर जीवापाड प्रेम केल्यानंतर, अनेक अडचणींवर मात करून ४ जून रोजी मोठ्या उत्साहात विवाहबद्ध झालेल्या दीपाली लिहिणार यांचा अवघ्या सातव्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे नवविवाहितेचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला असून, लिहिणार आणि खंडाळे या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपाली आणि संदीप यांचा विवाह सोहळा अत्यंत दिमाखदार असा पार पडला होता. पण लग्नानंतर अवघ्या सात दिवसांनी दोन्ही कुटुंबावर काळाने घाला घातला

    या घटनेतील सर्वात चटका लावणारी गोष्ट म्हणजे, मृत दीपाली लिहिणार आणि संदीप खंडाळे यांचा प्रेमप्रवास साधा नव्हता. तब्बल १५ वर्षे म्हणजेच दीड दशक त्यांनी एकमेकांना साथ दिली. सुख-दुःखात सोबत राहून त्यांनी हे नाते जपले आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ४ जून २०२६ रोजी अत्यंत थाटामाटात आणि आनंदाच्या वातावरणात हा विवाह सोहळा पार पाडला होता. आपल्या १५ वर्षांच्या अथांग प्रतीक्षेनंतर आता सुखाचा संसार सुरू होणार, या आनंदात संदीप आणि दीपाली होते.

    माहेरी आली अन् घात झाला…

    लग्नानंतरच्या काही विधींसाठी आणि पाठवणीसाठी दीपाली आनंदाने आपल्या माहेरी आली होती. घरात अजूनही लग्नाची लगबग आणि पाहुण्यांची वर्दळ सुरूच होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना, संध्याकाळच्या सुमारास दीपाली या बाथरूममध्ये गेल्या. तिथे अचानक त्यांना तीव्र चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. खाली पडल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा करुण अंत झाला.

    दीपाली लिहिणार यांच्या हातावरील मेहंदीचा रंग अजून जसाच्या तसा होता, अंगावरील हळदीची छटाही पूर्ण उतरली नव्हती. १५ वर्षांची प्रतीक्षा संपवून नव्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर सुखी संसाराची पहिली पावले टाकत असतानाच नियतीने हा अत्यंत क्रूर डाव साधला. काही दिवसांपूर्वी ज्या घरात सनई-चौघडे वाजले, तिथे आता दोन्ही कुटुंबांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू येत आहे. एका अनपेक्षित अपघाताने हसताखेळता संसार अर्ध्यावर मोडल्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा