• Sat. Jun 13th, 2026
    Kumbhar Samaj Schemes : कुंभार समाजासाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण आदेश; 700 ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ, नव्या सवलतींचा वर्षाव

    कुंभार समाजासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा समोर आली आहे. वर्षाला ७०० ब्रास मातीवर रॉयल्टी माफ, सोबतच अनेक सवलतींचा लाभ सरकारने जाहीर केला आहे. कोणत्या सवलती सरकारने जाहीर केल्या आहेत?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राज्यातील पारंपरिक कुंभार समाजाच्या आर्थिक आणि व्यावसायिक उन्नतीसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभार समाजासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. राज्यातील पारंपरिक कुंभार समाजाला मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता पिढीजात कुंभार कुटुंबांना वर्षाला ७०० ब्रासपर्यंत माती उत्खननासाठी कोणतेही स्वामित्वधन अर्थात रॉयल्टी भरावी लागणार नाही. यासोबतच ओळखपत्र, एक खिडकी योजना आणि क्लस्टर विकासासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

    महसूल विभागाने जारी केलेल्या तरतुदीनुसार, पिढीजात कुंभार कुटुंबांना विटा, कौले तसेच इतर मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी तलाव, खाडी, नदी, नाला किंवा शासकीय पडीक जमिनीतून वर्षाला ७०० ब्रासपर्यंत माती रॉयल्टीशिवाय उपलब्ध होणार आहे.

    कुणाला मिळणार लाभ?

    ‘पिढीजात कुंभार कुटुंब’ या व्याख्येत पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील अपत्यांचा समावेश असेल. या योजनेचा लाभ कुटुंबातील एका व्यक्तीस दिला जाणार आहे. याशिवाय गावतळी, पाझर तलाव, बंधारे किंवा पाणलोट क्षेत्रातील गाळ व माती कुंभार कुटुंबाने स्वखर्चाने काढल्यास त्यावरही ७०० ब्रासपर्यंत रॉयल्टी आकारली जाणार नाही. मात्र यासाठी संबंधित विभागाची ना-हरकत आणि विहित शुल्कांचा भरणा आवश्यक राहणार आहे.

    Maharashtra TimesKolhapur News: आईच्या निधनाचा आघात ताजा असतानाच देशासाठी प्राणांची आहुती! उरीत कोल्हापूरचे विक्रम चव्हाण शहीद; चिमुकली पोरकी झाली, उद्या पार्थिव गावी पोहचणार

    कुंभार समाजाला मिळणार या सुविधा

    1. महाखनिज संगणक प्रणालीवर ऑनलाईन अर्जाची सुविधा
    2. तहसीलदार कार्यालयामार्फत डिजिटल स्वाक्षरीयुक्त ओळखपत्र
    3. ओळखपत्राची वैधता पाच वर्षे
    4. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक खिडकी योजना
    5. कुंभार व्यवसायासाठी विशेष क्लस्टर विकास
    6. पारंपरिक कुंभार खाणींवरील अतिक्रमणे हटविण्यास प्राधान्य
    7. औष्णिक विद्युत केंद्रांमधून फ्लाय ॲश प्रति टन १०० रुपयांदराने उपलब्ध
    8. जीवनमान उंचावण्यास मदत

    कच्च्या मालाची कमतरता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे कुंभार व्यवसाय अनेक अडचणींना सामोरा जात होता. या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कुंभार बांधवांना व्यवसाय वाढविण्यास मदत होणार असून त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा