• Thu. Jun 11th, 2026

    Thane News : आता ‘त्या’ मुजोर रिक्षाचालकाची खैर नाही, थेट शिंदेंचे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश

    Thane News : आता ‘त्या’ मुजोर रिक्षाचालकाची खैर नाही, थेट शिंदेंचे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश

    ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमाअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेत. काल संध्याकाळी रस्त्यावर थुंकणाऱ्या परप्रांतीय चालकाला एका वृद्धाने जाब विचारल्यानंतर या चालकाने खाली उतरून या वृद्धाला बेदम मारहाण केली होती. यावेळी या परप्रांतीय चालकाने या वृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी हातात दगड घेतल्याचेही स्पष्टपणे दिसत होते. ही घटना समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन परप्रांतीय चालकावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी जाब विचारल्याने वृद्ध नागरिकाला परप्रांतीय चालकाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. मारहाणीत वृद्ध नागरिकाला दुखापत झाली असून या घटनेची चित्रफित प्रसिद्ध होताच शिवसेना व शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी या चालकाला शोधून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीने दखल घेत ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधत कठोर कारवाईचे आदेश दिले.

    ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयासमोरील पदपथावरून मंगळवारी सायंकाळी वृद्ध दाम्पत्य जात होते. यावेळी चालक निशांत धर शुक्ला (४०) भर रस्त्यात थुंकला. या कृत्याबाबत वृद्धाने चालक शुक्ला याला जाब विचारत असे कृत्य करू नये, असे सांगितले. त्यामुळे शुक्ला याने वृद्धाला धक्काबुक्की केली. या झटापटीत त्याने वृद्धाला मारहाण करत पदपथावर ढकलले. त्यात त्यांना दुखापत झाली.

    या प्रकाराची चित्रफीत प्रसिद्ध होताच शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख सुमित बोराटे व शिवसेनेचे शाखाप्रमुख नितेश पाटोळे यांनी शुक्ला याला शोधून वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच या प्रकरणी परप्रांतीय चालकावर ३०७ कलमाअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले.

    या परप्रांतीय चालकाने या वृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी हातात दगड घेतल्याचेही स्पष्टपणे दिसत होते. अशाप्रकारे अस्वच्छता केल्याचे लक्षात आणून दिल्यावरही जाब विचारणाऱ्याला गंभीर मारहाण होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. या घटनेत वृद्धाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे चालकावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.

    या घटनेचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेत स्थानिक शिवसैनिकांनी या चालकाला शोधून अद्दल घडवून त्याला वर्तक नगर पोलीस स्थानकात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र ही घटना समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन परप्रांतीय चालकावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले आहेत.

    वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकाला शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या शिवसेना स्टाईल धडा शिकवला. परप्रांतीय चालकाला चोप देतानाचे व्हिडीओदेखील आता समोर आले आहेत. संबंधित प्रकाराबाबत शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख सुमित बोराटे यांना माहिती मिळताच त्यांनी अवघ्या दोन तासांत वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकाला शोधले. तसेच शिवसेनेचे शाखाप्रमुख नितेश पाटोळे यावेळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवसेना स्टाईल धडा या चालकाला शिकवला. निशांत धर शुक्ला (४०) असे या चालकाचे नाव असून त्याला शिवसैनिकांनी वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

    मुजोरी वाढल्याचा मनसेचा आरोप

    वृद्ध नागरिकाने हटकल्यानंतर त्यांना मारहाण करण्याची मुजोरी या परप्रांतीय नागरिकांना येथील राजकीय पक्षांमुळे येते, असा आरोप मनसे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. या मुजोर नागरिकांना मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल, असे जाधव यांनी सांगितले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा