जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मंत्री उदय सामंत हे तळ ठोकून आहेत. विधान परिषद निवडणुकीदरम्यान महायुतीच्या उमेदवाराच्या समोर असलेल्या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी मंत्री उदय सामंत गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये आहेत. या दरम्यान आज अतिशय महत्त्वाच्या आणि हायव्होल्टेज घडामोडी नाशिकमध्ये घडल्या. मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे या तिघांनी मिळून भाजपमधून बंडखोरी केलेले प्रसाद हिरे यांच्यासोबत चर्चा केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिक इथल्या निवासस्थानी या चारही नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी प्रसाद हिरे यांची समजूत काढण्यात तीनही मंत्र्यांना मोठं यश आलं. या बैठकीनंतर माध्यमांसमोर येत प्रसाद हिरे यांनी या विधान परिषद निवडणुकीत आपण माघार घेत असून , आपण महायुती सोबत असल्याचे स्पष्ट केले.
मालेगाव येथील विविध प्रश्न आणि इतर मागण्यांसाठी प्रसाद हिरे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. मालेगाव येथील भू माफिया, नारपारचा प्रश्न, मालेगाव इथल्या काही भागातील शाळकरी मुलांना अजूनही बोटीने प्रवास करावा लागत असल्याचा प्रश्न , असे अनेक विषय आपण मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांच्यासमोर मांडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत आपल्याला आश्वासन देत हे प्रश्न मार्गी लावून लवकरच मालेगाव येथेच हाय लेवल मीटिंग घेऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर आपण या निवडणुकीतून माघार घेत असून महायुतीसोबत आपण असणार असल्यास त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले.
यानंतर प्रश्न राहिला होता तो म्हणजे अपक्ष उमेदवारी करत असलेल्या गोकुळ गीते यांचा. प्रसाद हिरे यांची माघारी झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे हे एकाच गाडीने ओझर विमानतळाकडे रवाना झाले. उद्या कॅबिनेट मीटिंग असल्याने आपण मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी निवासस्थानी दिली. त्यानंतर महाजन, सामंत आणि भुसे यांचा ताफा हा ओझर विमानतळाकडे रवाना झाला.
दरम्यान, गोकुळ गीते हे ओझर विमानतळावर मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याचे दिसून आले. गिरीश महाजन आणि गोकुळ गीते यांची गाडीमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यांनंतर विमानतळाच्या आत बराच वेळ महाजन, सामंत आणि भुसे या मंत्र्यांसमवेत गोकुळ गीते यांची बैठकही सुरू होती. मात्र गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात यश आले नसल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळ येथे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत गोकुळ गीते यांची बैठक संपन्न झाली. सकाळपासून गीते हे बाहेरगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती. मात्र उद्या कॅबिनेट मीटिंग असल्याने मंत्री गिरीश महाजन हे ओझर विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार होते. याचवेळी ओझर विमानतळ येथे काही वेळ गाडीत आणि त्यानंतर विमानतळ परिसराच्या आता महाजन, सामंत आणि भुसे या तीनही मंत्र्यांसमवेत गोकुळ गीते यांची बैठक झाली.
मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र कुठेतरी गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात यश आले नसल्याची माहिती असून गोकुळ गीते हे ही निवडणूक लढण्यासाठी अद्याप तरी ठाम असल्याची माहिती आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते हे उद्यापर्यंत आपला जाहीर पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ही बैठक संपल्यानंतर गोकुळ गीते यांनी माध्यमांना कुठली प्रतिक्रिया न देताच चकवा देत निघून जाणं पसंत केलं.
दिवसभर आज राजकीय नाट्य नाशिकमध्ये पाहायला मिळाले. अखेर मंत्र्यांनी मुंबईकडे विमानाने झेप घेतली आणि गीते यांनी अज्ञातस्थळी जाणे पसंत केले. आता गिरीश महाजन यांनी दाखवलेला विश्वास कितपत खरा होतो? की गोकुळ गीते ही निवडणूक लढण्यावर ठाम राहतात? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा