Raigad Shivrajyabhishek Accidental Death a Youth : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच काल रायगड येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक झाल्यानंतर एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.
नेमका कसा झाला अपघात?
सातारा जिल्ह्यातील केंजळेवाडी (किंजळे) येथील कपिल केंजळे हा शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आला होता. सोहळा आटोपून पोलादपूर मार्गे आपल्या गावी परतत असताना त्याच्या वाहनाचा अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या कपिलला पोलादपूर पोलिसांनी तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच रायगडावरून परतणाऱ्या आणखी दोन शिवभक्तांच्या मोटारसायकलीचा अपघात होऊन ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Chhatrapati Sambhajinagar News: नुकतीच दहावी पास झालेली तीन मुलं साई टेकडी तलावात बुडाली, काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर सुन्न!
यापूर्वीही शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर गंभीर अपघातांच्या घटना घडल्या आहेत. ६ जून २०२५ रोजी झालेल्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या शिवप्रेमींना घेऊन जाणारी जीप माणगाव तालुक्यातील बोरवाडी गावाजवळ उलटली होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात अनेक शिवभक्त गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
याआधीही अशा घटना घडलेल्या
तसेच जून 2023 मध्ये 349व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दोन दुर्दैवी घटना घडल्या होत्या. बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील 19 वर्षीय ओमकार दीपक भिसे हा शिवभक्त रायगडाच्या पायऱ्या चढत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 4 जून 2023 रोजी पुणे येथील प्रशांत गुंड (वय 28) या शिवभक्ताचाही गडावर असताना मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांची प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली होती.
Revas-Reddi Coastal Highway: खाडीवर उभा राहतोय कोकणचा ‘गेमचेंजर’ पूल; रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे वाहतूक वेगवान होणार
याशिवाय एका शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान रायगडाच्या महादरवाजाजवळ अचानक दरड कोसळून एका शिवभक्ताचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर दुर्घटनाही घडली होती. या घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्या. दरवर्षी सोहळ्यापूर्वी कड्यांवरील सैल आणि धोकादायक दगड हटविण्याची मोहीम राबविण्यात येते. दरवर्षी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, वाहतूक नियंत्रण आणि परतीच्या प्रवासातील सुरक्षितता याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. यंदाच्या दुर्घटनेनंतर शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
