Sunetra Pawar On Chhagan Bhujbal Rajya Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असताना उमेदवाराबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होत आहे. याबाबत माध्यमांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
शेतकऱ्यांची भेट घेतली, पाहणी केली
दरम्यान, बारामती मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माळवाडी, ता. बारामती येथे जाऊन बाधित भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, लवकरच मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Maharashtra Monsoon: आला रेss आला! महाराष्ट्रात मान्सून धडकला, शेतकरी राजा सुखावला, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात बरसणार
नुकसान भरपाईची रक्कम दिली
पवार यांनी मौजे माळवाडी (लोणी) येथे २ जून रोजी झालेल्या वादळात पत्र्याच्या शेड पडून मयत झालेल्या नंदाबाई जनार्धन लडकत यांच्या कुटुंबियांचे भेटून सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुटुंबियांना नुकसान भरपाई रक्कम म्हणून ४ लाख रुपये व २ शेळयांना ८ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रल्हाद पांडुरंग लडकत यांना १६ हजार रुपये, बाळासाहेब अमृता लडकत यांना ८ हजार रुपये आणि नंदा प्रताप फरांदे यांना १२ हजार रुपयांचा नुकसान भरपाईबाबतचा धनादेश सुपूर्द करण्यात आले.
४ गावांत ९५ हेक्टरवर नुकसान
मौजे गुणवडी येथील राधा रवीन आगवणे यांचे घराचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले आहेत, मौजे काऱ्हाटी येथे नारायण लोणकर यांच्या शेतात सुमारे संख्या २५० ते ३०० केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मौजे मोडवे येथील गुलाब मोटे यांच्या १० शेळ्या, तिन मेंढ्या व १ कुत्रा वीज पडून मयत झालेले आहेत. तालुक्यातील ४ गावात १६९ शेतकऱ्यांचे ९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
