एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाचे साहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे, अन्नसुरक्षा अधिकारी ललित सोयाम, रावसाहेब वाकडे, महेश चहांदे यांच्या पथकाने हिंगणा एमआयडीसी भागातील सोनेगाव येथील मे. एफ. डी. सी. लिमिटेड या वितरक पेढीला भेट दिली. या पेढीद्वारे विक्री करण्यात येणाऱ्या ‘एनर्झल’ या पेयाच्या लेबलवर ‘एनर्जी अँड इलेक्ट्रोलेट ड्रिंक’ असे लिहिलेले होते. हे संयुक्त नसल्याने त्यावर कारवाई करण्यात आली.
Akanksha Chaturvedi : आई, बाबा मला माफ करा, NEET परीक्षा पुन्हा देण्याचं धाडस नाही, नागपुरात विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यावतीने २६ मे रोजी छत्रपती संभाजीनगरच्या वळूज येथील एफडीसी लिमिटेड या एनर्झल उत्पादन करणाऱ्या पेढीला पत्र पाठवून एनर्झल हे फ्रुट ड्रिंक ‘अनब्रँडेड’ असल्याचे कळविले होते. अशी सूचना देऊनही नागपुरात त्याची विक्री होत सुरू होती. त्यामुळे एफडीएने फ्रुट ड्रिंक एनर्झल, ऑरेंज फ्लेवर, ब्लिट्स फ्लेव्हर, ॲपल फ्लेव्हर, फ्रिमिक्स फॉर वॉटर बेस्ड फ्लेव्हर ड्रिंक, लाइम फ्लेव्हर एनर्जी ड्रिंक आणि इलेक्ट्रोलाइट ड्रिंक असे १० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले. १ लाख ७९ हजार ६२७ बाटल्या व पाकिटे असा साठा जप्त करण्यात आला, असे एफडीएने सांगितले.
MLC Election: विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार? ‘औपचारिक लढतीत अर्थ नाही’, शेवटच्या क्षणी बावनकुळेंचं काँग्रेसला महत्त्वाचं आवाहन!
संशय आल्यास इथे साधा संपर्क
विश्लेषणासाठी घेण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६अंतर्गत करण्यात येईल. तोपर्यंत जप्त केलेला साठा सील करून ठेवला आहे. अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी या कारवाया केल्या.
गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवा! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी
सात लाखांचा औषधसाठा पकडला
विनापरवाना औषध विक्री प्रकरणी धंतोली येथील क्लिनिकवर छापा टाकून सुमारे सात लाखांचा औषधसाठाही जप्त करण्यात आला. धंतोली येथील डायमंड वन इमारतीतील न्यू रूट स्किन, लेझर, हेअर ट्रान्सप्लान्ट क्लिनिक येथून या औषधांची विक्री होत होती. साहाय्यक आयुक्त मनीष चौधरी, अंजली मिटकर, औषध निरीक्षक प्रशांत रामटेके, अभिषेक चवरडोल यांनी ही कारवाई केली. औषधांच्या खरेदीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी खरेदी बिले सादर केली नाहीत. परवाना नसतानाही १६ रेमेडिज नाशिक या परवानाधारक कंपनीच्या नावाने रुग्णांना औषध विक्री बिले देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले, असे एफडीएने सांगितले.
