• Tue. Jun 16th, 2026

    पुण्याचे 82 वर्षीय आजोबा स्कूटीवर निघाले, वाटेत विस्मरण, लेकीची पोलिसांकडे धाव, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळ्यात काय घडलं?

    पुण्याचे 82 वर्षीय आजोबा स्कूटीवर निघाले, वाटेत विस्मरण, लेकीची पोलिसांकडे धाव, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळ्यात काय घडलं?

    Pune Old Man lost Home address : ‘वडिलांचे वय ८२ वर्षे असून त्यांना विस्मरणाचा त्रास आहे. ते स्कुटीवर बाहेर पडले आहेत. आता अंधार पडला असल्याने त्यांना व्यवस्थित दिसेल की नाही, याची खूप चिंता वाटतेय,’ असे उत्तर लेकीने दिले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : ‘साहेब, माझे वडील दुपारपासून घरातून बाहेर गेले आहेत. ते फोनवर बोलत आहेत, पण ते नेमके कुठे आहेत हे त्यांनाच सांगता येत नाही…’ ३० मे रोजी सायंकाळच्या साडेसात वाजता वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात एक महिला आणि तिचे पती घाईघाईने पोलिस ठाण्यात दाखल होत, पोलिसांकडे मदतीची याचना करीत होते.

    वडिलांना विस्मरणाचा त्रास

    त्या वेळी ड्युटीवर हजर असलेले पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे यांनी त्यांची विचारपूस सुरू केली. पोलिस अधिकाऱ्यांनी कारण विचारले असता, ‘त्यांचे वय ८२ वर्षे आहे. त्यांना विस्मरणाचा त्रास आहे. ते स्कुटी घेऊन बाहेर पडले आहेत. आता अंधार पडला आहे. त्यांना व्यवस्थित दिसेल की नाही, याची खूप चिंता वाटतेय,’ असे उत्तर मिळाले.

    वाहनांच्या आवाजावरुन अंदाज

    दरम्यान, मुलगी सतत वडिलांशी फोनवर संपर्क ठेवून त्यांच्याकडून त्यांच्या ठिकाणाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, आजोबांना आपण कुठे आहोत, याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे कुटुंबीय अधिकच हतबल झाले होते. उपनिरीक्षक शिरोळे यांनीही आजोबांशी फोनवर संवाद साधला. ‘तुम्ही आता कुठे आहात?’ असा प्रश्न वारंवार विचारला गेला. मात्र, त्यांना त्याचेही उत्तर देता येत नव्हते. संभाषणादरम्यान एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. फोनवरून सतत वाहनांचा आवाज ऐकू येत होता. यावरून आजोबा एखाद्या गजबजलेल्या रस्त्याजवळ असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. ‘त्यांच्या मोबाइलचे लोकेशन शोधता येईल का,’ अशी विचारणा जावयाने केली.
    Maharashtra TimesDelhi Fire : लग्नाला 3 वर्ष, पण पाळणा हलला नाही; IVF उपचारासाठी तरुणी दिल्लीत, हॉटेलमधील आगीने स्वप्नांना टाचणी

    एक्स्प्रेस वेवरील धोक्यातून सुखरुप

    पोलिसांनी वेळ न दवडता महामार्ग पोलिस पेट्रोलिंग यंत्रणेशी संपर्क साधला. खंडाळा विभागातील महामार्ग पोलिस अंमलदार हनुमंत कोळी यांना आजोबांच्या लोकेशनची माहिती देण्यात आली. त्यानुसार त्यांनी तातडीने परिसरात शोधमोहीम सुरू केली. मोबाइल लोकेशनच्या आधारे त्यांनी आजोबांचा माग काढला आणि काही वेळातच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळविले.

    गळ्यात कांद्यांच्या माळा, बैलगाडीतून एन्ट्री; युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात बारामतीत हल्लाबोल मोर्चा

    आजोबा सापडले. त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. ते सुखरूप असल्याची माहिती तत्काळ त्यांच्या मुलगी व जावयाला देण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी खंडाळ्यात जाऊन आजोबांना सुरक्षितपणे घरी आणले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, पोलिसांची समयसूचकता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यामुळे स्वतःचे ठिकाण सांगू न शकणाऱ्या, विस्मरणाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ८२ वर्षीय आजोबांना एक्सप्रेस वेवरील धोकादायक परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
    Maharashtra TimesDelhi Fire : आगीत प्राण गेले, पण शेवटची मिठी सुटली नाही; वॉशरुममध्ये एकमेकांना कवेत घेतलेल्या अवस्थेतच जोडप्याचा अंत, काळीज पिळवटणारं दृश्य

    पोलिसांच्याही अंगावर काटा आला

    पोलिस अंमलदार शिरीष गावडे यांनी तांत्रिक प्रक्रियेसाठी मदत करून संबंधित मोबाइल क्रमांकाच्या आधारे लोकेशन शोधले. काही वेळातच मोबाइलचे लोकेशन सापडले आणि सर्वांनाच धक्का बसला. आजोबा पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा परिसरात असल्याचे समोर आले. वारजे ते खंडाळा हे अंतर ७२ किलोमीटर होते. तेथे पोहोचण्यासाठी किमान पावणेदोन तासांचा कालावधी लागणार होता. अंधार गडद होत होता. एक्सप्रेस हायवेवर ताशी शंभर किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहने धावत होती. अशा ठिकाणी ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक स्कुटीसह एकटे असल्याचे कळाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांसह पोलिसांच्याही अंगावर काटा आला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा