Harshwardhan Sapkal On BJP: विधान परिषदेच्या १७ पैकी पाच मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार रिंगणात असल्याने तेथील निवडणूक बिनविरोध झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर सपकाळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की विधान परिषदेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीचा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी असतात. हा मर्यादित मतदार असतो. मात्र, या निवडणुकीतदेखील राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’चा खेळ खुलआमपणे सुरू आहे.
Dillip walse Patil यांनी Sharad Pawar यांची भेट घेतली, नेमकं कारण काय?
अर्ज माघारीसाठी जवळपास दीडशे कोटी खर्च- संजय राऊत
विधान परिषदेच्या अहिल्यानगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली आहे. मात्र, या मतदारसंघात अपक्ष दत्तात्रय पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर पानसरे यांचे आव्हान आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे बंडखोर समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला आहे. नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवीण पाटील-चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Maratha Reservation: मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला, हेल्पलाइन नंबरही जारी
राज्यात विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, असा आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला. निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी आज जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रमुख उमेदवारांना किमान २५ कोटी रुपये दिले गेले आहेत. काल मुंबईतील सॉफीटेल या हॉटेलमध्ये एक व्यवहार झाला. त्यानंतर कोकणातील रायगडमध्ये माघार घेण्यात आली. संभाजीनगरात आमच्या एका उमेदवाराने माघार घेतली. तिथेही साधारण त्याच पद्धतीने व्यवहार झाले’, असे राऊत म्हणाले.
