• Sat. Jun 20th, 2026

    Nanded News : मानवी साखळी अन् स्विमिंग पूलमध्ये डान्स; नांदेडमधल्या गायब नगरसेवकांची गोव्यात मौजमजा

    Nanded News : मानवी साखळी अन् स्विमिंग पूलमध्ये डान्स; नांदेडमधल्या गायब नगरसेवकांची गोव्यात मौजमजा

    नांदेडमध्ये गायब झालेल्या नगरसेवकांची गोवा येथे मौजमजा सुरु असल्याचं समोर आलं आहे. या नगरसेवकांचे समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरुन वंचितच्या उमेदवाराने आक्षेप घेत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक शहरांमधील नगरसेवक हे सहलीवर गेले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नांदेड : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमधील नगरसेवक सहलीला गेले आहेत. नांदेडमधील नगरसेवकही सहलीला गेले आहेत. पण त्यांच्या सहलीचे समोर आलेले व्हिडीओ हे चर्चेला कारण ठरत आहेत. विधान परिषद निवडणूक दोन दिवसावर शिल्लक असताना नांदेड जिल्ह्यातील नगरसेवक गोवा आणि कोकण येथे मौजमजा करत असताना व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.

    नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे प्रशांत इंगोले यांनी 12 तारखेला नगरसेवक गायब झाल्याची तक्रार केली होती. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या दोन्ही प्रस्थापित पक्षाकडून पैसे खर्च करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुका निष्पक्ष व्हायला पाहिजे, अशी मागणी प्रशांत इंगोले यांनी केली आहे. नगरसेवकांचे तिकीटचे पैसे, हॉटेल्सचा खर्च कोण करत आहे? याची चौकशी करण्याची मागणी इंगोले यांनी केली आहे.

    नगरसेवकांच्या व्हायरल व्हिडीओत काय?

    विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या देगलूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक गोव्याला सहलीसाठी गेले आहेत. त्यांचा मौजमजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नगरसेवक गोव्याच्या बीचवर मानवी साखळी बनवून नाचत असल्याचं दिसत आहे. तर एका व्हिडीओत नगरसेवक स्विमिंग पूलमध्ये नाचत असल्याचं दिसत आहे.

    राज्याच्या इतर भागातीलही नगरसेवक सहलीवर

    नगरसेवक सहलीला पाठवण्याची घटना केवळ नांदेडमध्ये घडलेली नाही. तर नागपुरात भाजपचे 108 नगरसेवक सहलीला गेले आहेत. हे नगरसेवक आधी मुंबई आणि नंतर गोव्याला सगलीला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच नाशिकचे देखील शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक सहलीला गेल्याची माहिती आहे. साताऱ्यात भाजपचे नगरसेवरही सहलीवर गेले आहेत. तर गोंदियात भाजपच्या नगरसेवकांसोबत काँग्रेसचे 3 नगरसेवक सहलीला गेल्याची चर्चा आहे.

    Nanded News

    वंचितच्या प्रशांत इंगोले यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी

    “18 तारखेला नांदेड स्थानिक प्राधिकरणाच्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर आम्ही 12 तारखेला ऑब्जर्वर मॅडमना निवेदन दिलं होतं की, नगरसेवक मिळत नाहीत. नगरसेवक महापालिकेत, घरी नाहीत. त्यांना कुणीतरी ओलीस ठेवलं आहे, अपहरण केलं आहे, किंवा त्यांना पैशांचं आमिष दाखवून सहलीला पाठवलं आहे. याच नगरसेवकांच्या टीमचे गोव्यातील सहलीचे व्हिडीओ समोर आले आहेत”, असं प्रशांत इंगोले म्हणाले.

    Prashant Ingole
    वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी

    आम्ही ऑब्जर्वर आणि जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांचे मोबाईल नंबरही दिले होते. त्यांना ट्रॅक करुन परत नांदेडला आणण्याची विनंती केली. तसेच अशाप्रकारे निवडणुका होत असतील तर निवडणूक रद्द करा, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे”, अशी भूमिका वंडितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी मांडली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा