• Fri. Jun 5th, 2026
    Ahilyanagar MLC Election : ‘मी माघार घेतलीच नाही, अन्याय झाल्यास…’; अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरेंचा गंभीर आरोप, अहिल्यानगरमध्येही हायव्होल्टेज ड्रामा

    Ahilyanagar MLC Election Dattatraya Pansare : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या घडामोडींमध्येच अहिल्यानगरमध्ये देखील मोठी घडामोड समोर आली आहे.

    विधान परिषद निवडणूक अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्याक्षणी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी ‘मी माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला नाही, माझी खोटी सही करून निवडणूक बिनविरोध करण्याचा कट रचला जात आहे’, असा गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयातच आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानं एकच खळबळ उडाली.

    दत्तात्रय पानसरे नेमकं काय म्हणाले?

    ‘मी कोणालाही प्राधिकृत केलेलं नाही. माझ्या नावानं खोटं पत्र वापरून मला निवडणुकीतून बाहेर करण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असा गंभीर आरोप पानसरे यांनी केला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणी शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरे यांच्या वतीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची प्रक्रिया पार पडली. मात्र, त्यानंतर स्वतः पानसरे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ‘मी कोणालाही प्राधिकृत केलेलं नाही. माझ्या नावानं खोटं पत्र वापरून मला निवडणुकीतून बाहेर करण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. निवडणूक अधिकाऱ्यांकडून पानसरे यांच्या कथित प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीची पडताळणी सुरू करण्यात आली असून, संबंधित कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
    Maharashtra TimesUddhav Thackeray: उमेदवाराने शेवटच्या क्षणी दगा दिला, राणेंच्या भेटीनंतर अर्ज मागे; उद्धव ठाकरेंकडूनही एक घाव दोन तुकडे!

    पानसरेंच्या भूमिकेमुळे प्रशासनाची धावपळ

    ‘माझा अर्ज अवैधरित्या माघारी दाखवला गेला, तर तो माझ्यावर अन्याय असेल. अशा परिस्थितीत मी आत्मदहन करेन’, अशी आक्रमक भूमिका पानसरे यांनी घेतल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. दत्तात्रय पानसरे यांचा अर्ज माघारी झाल्यास महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात असल्यानं या घडामोडींना मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. अंतिमक्षणी रंगलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरूच आहे.
    Maharashtra TimesNanded MLC Election : कधीकाळी कट्टर विरोधक, आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर बॅकफूटवर, पुत्रप्रेम बाजूला; प्रताप पाटील चिखलीकरांची अशोक चव्हाणांना साथ

    नाशिकमध्ये संघर्ष होणार!

    दरम्यान, नाशिकमध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवार न दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र, भाजपमधूनच बंडखोरी झाल्यानं निवडणुकीत रंगत निर्माण झाली. शहरातील भाजपचे पदाधिकारी गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी समजावल्यानंतर गणेश गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला. परंतु ‘या मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या मुलाने माझ्या वडिलांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत पोहोचल्याने मी आता माघार घेऊ शकत’ नसल्याची भूमिका घेत गोकुळ गिते यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा