• Fri. Jun 5th, 2026

    MLC Election : अभयसिंह जगताप यांचा सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतला राड्याचा उल्लेख, विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट

    MLC Election : अभयसिंह जगताप यांचा सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतला राड्याचा उल्लेख, विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट

    सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच राडा झालेला बघायला मिळाला होता. याच राड्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघात भाजपकडे मतदारांचे संख्याबळ जास्त आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांना महायुतीचा धर्म पाळावा लागेल. पण त्यांचे सदस्य आणि नगरसेवक हे सातारा झेडपीतील राडा विसरणार नाहीत. या मतदारसंघात चमत्कार घडेल आणि गत निकालाचीच पुनरावृत्ती होईल, असं वक्तव्य करत महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी खळबळ उडवून दिली आहे.

    सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या महायुती आणि महाविकास आघाडीत खरी लढत होणार, हे आज दुपारी स्पष्ट झाले. निवडणूक रिंगणात तीन उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवार हे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्यातच खरी लढत आहे. शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनीही अर्ज दाखल केला होता. तो त्यांनी आज मागे घेतला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांना माघार घ्यायला सांगून अभयसिंह जगताप यांचा अर्ज ठेवण्यात आला.

    सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघात एकूण 824 मतदार आहेत. त्यापैकी महायुतीतील भाजपकडे 314, राष्ट्रवादी काँग्रेस 205, शिवसेना 111, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 119, कॉंग्रेस 73 आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष 1, असे संख्याबळ आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे संख्याबळ 610 आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ 193 एवढं आहे. संख्याबळ पाहता महायुतीचे पारडे जड वाटत असले तरी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत आणि सत्ता स्थापनेवेळी महायुतीत झालेल्या संघर्षाचा मतांवर परिणाम होण्याची धास्ती आहे.

    आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी साताऱ्यात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांनी सकाळी पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. महायुती धर्म पाळून ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून ताकदीने लढणार आहोत. बाकीच्या वाद विवादावर सर्व नेते एकत्र बसून चर्चेतून तोडगा काढतील, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली. त्यानंतर ते आणि भाजप उमेदवार एकाच गाडीतून सांगलीला गेले.

    शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांच्या वक्तव्याची चर्चा

    “झेडपीतील राड्यात शंभूराज देसाई जखमी झाले होते. हातातून रक्त आलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, हे रक्त मी विसरणार नाही. नेते म्हणून कदाचित त्यांना विसरावं लागू शकतं. पण, कार्यकर्ते म्हणून त्यांचे सदस्य ती घटना कदापि विसरणार नाहीत”, असं वक्तव्य शरद पवार गटाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा