• Fri. Jun 5th, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक, 6 जूनला अनेक गाड्या रद्द, अनेकांचे वेळापत्रक बदलले

    Central Railway : मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक, 6 जूनला अनेक गाड्या रद्द, अनेकांचे वेळापत्रक बदलले

    आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यासाठी आणि जुने पॅनल काढण्यासाठी येत्या शनिवार-रविवारी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग वळवण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यासाठी आणि जुने पॅनल काढण्यासाठी येत्या 6 जून (शनिवार) ते 7 जून (रविवार) पर्यंत आसनगाव आणि तानशेत स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 6 जूनला दुपारी 2 वाजेपासून ते रात्री 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचे परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन करण्याचा म्हणजेच नियोजित थांब्याआधीच येणाऱ्या थांब्याला शेवटचा थांबा करण्याचा, तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    कोणकोणत्या गाड्या रद्द :

    • 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्सप्रेस
    • 11012 धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
    • 12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड पंचवटी एक्सप्रेस
    • 12110 मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस

    गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन :

    • 17611 हुजूर साहेब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०५.०६.२०२६ मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
    • 12072 हिंगोली डेक्कन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ रोजीची नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
    • 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ मनमाड येथून शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येईल.
    • 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ रोजीची नाशिक रोड येथून शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येईल.

    डाउन गाड्यांचे पुनर्निधारण:

    • 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा मेल जेसीओ (०६.०६.२०२६) चे वेळापत्रक बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ०७.०६.२०२६ रोजी ०१.२० वाजता प्रस्थान होईल (नियोजित प्रस्थान वेळ ०६.०६.२०२६ रोजी २१.१० वाजता)
    • 12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा मेल जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ रोजीची गाडी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ०७.०६.२०२६ रोजी ०१.३० वाजता सुटेल. (नियोजित सुटण्याची वेळ ०६.०६.२०२६ रोजी २२.१५ वाजता)
    • 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमृतसर एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ रोजीची ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ०७.०६.२०२६ रोजी पहाटे ०२.०० वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ ०६.०६.२०२६ रोजी २३.३० वाजता)
    • 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०७.०६.२०२६ रोजी पहाटे ०४.०० वाजता पुनर्निर्धारित केली जाईल. (नियोजित सुटण्याची वेळ ०६.०६.२०२६ रोजी २२.३० वाजता)
    • 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बनारस महानगरी एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०७.०६.२०२६ ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ०७.०६.२०२६ रोजी पहाटे ०२.१५ वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ ००.१५ वाजता)
    • 02141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष जेसीओ दिनांक ०७.०६.२०२६ रोजीची ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ०७.०६.२०२६ रोजी ०२.३० वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ ००.२० वाजता)
    • 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालिमार एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ रोजीची ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०७.०६.२०२६ रोजी ०१.२० वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ ०६.०६.२०२६ रोजी २२.०० वाजता)
    • 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०७.०६.२०२६ रोजी ०१.४५ वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ दिनांक ०६.०६.२०२६ रोजी २२.४५ वाजता)
    • 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्सप्रेस जेसीओ (दिनांक ०६.०६.२०२६) ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी दिनांक ०७.०६.२०२६ रोजी ०२.०० वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ दिनांक ०६.०६.२०२६ रोजी २३.३५ वाजता)
    • 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस जेसीओ (दिनांक ०७.०६.२०२६) ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी दिनांक ०७.०६.२०२६ रोजी ०२.१५ वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित सुटण्याची वेळ ००.१५ वाजता)
    • 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस जेसीओ (दिनांक ०७.०६.२०२६) ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी दिनांक ०७.०६.२०२६ रोजी ०२.३० वाजता पुनर्निर्धारित केली जाईल (नियोजित प्रस्थान वेळ ००.३५ वाजता)

    खाली जाणाऱ्या गाड्यांचे मार्गांतर

    खालील गाडी जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ कल्याण- कर्जत-पुणे – मनमाड मार्गे वळवण्यात येईल.

    • 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस- बलिया कामायनी एक्सप्रेस
    • 01027 दादर- गोरखपूर विशेष
    • 15066 पनवेल- गोरखपूर एक्सप्रेस
    • 11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बल्लारशाह एक्सप्रेस
    • 12131 दादर – साईनगर एक्सप्रेस जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ कल्याण- कर्जत- पुणे – साईनगर शिर्डी मार्गे वळवण्यात येईल.
    • 17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस जेसीओ दिनांक ६.६.२०२६
    • कल्याण -कर्जत- पुणे – दौंड कॉर्ड – मनमाड मार्गे वळवण्यात येईल.

    अप गाड्यांचे नियमन जेसीओ ०५.०६.२०२६

    • 01026 बलिया- दादर विशेष कसारा येथे १ तास ४५ मिनिटांनी
    • 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस इगतपुरी येथे ५० मिनिटे
    • 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल इगतपुरी येथे २० मिनिटांनी
    • 20104 भटनी – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस भुसावळ विभागावर १० मिनिटांनी
    • 11082 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस भुसावळ विभागात योग्यरित्या
    • 22537 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्स्प्रेस भुसावळ विभागात योग्य ठिकाणी.
    • 11062 जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस भुसावळ विभागात योग्य ठिकाणी.
    • 01080 गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष भुसावळ विभागात योग्य ठिकाणी.
    • 11203 नागपूर – मडगाव जेसीओ दिनांक ०६.०६.२०२६ रोजी भुसावळ विभागात ३० मिनिटे.

    ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज

    ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

    उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन

    • ०६.०६.२०२६ रोजी ११.४२ ते २०.४४ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा उपनगरी ट्रेनचा प्रवास आसनगाव येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल.
    • ६.०६.२०२६ रोजी २१.३२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा उपनगरी ट्रेनचा प्रवास खडवली येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल.
    • ०६.०६.२०२६ रोजी २२.४७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा उपनगरी ट्रेनचा प्रवास टिटवाळा येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल.
    • ०६.०६.२०२६ रोजी ००.०८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा लोकलचा प्रवास दिनांक ०७.०६.२०२६ रोजीची गाडी कल्याण येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
    • ०६.०६.२०२६ रोजी १३.३१ ते २२.०० वाजेपर्यंत कसारा येथून सुटणाऱ्या कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन आसनगाव येथूनच पुढे सुरू (शॉर्ट टर्मिनेट) होतील.

    शेवटची आणि पहिली लोकल

    • कसारासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची डाउन लोकल N13 असेल, जी दिनांक ०६.०६.२०२६ रोजी सकाळी १०.१६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
    • कसारासाठी ब्लॉकनंतरची पहिली डाउन लोकल N3 असेल, जी दिनांक ०७.०६.२०२६ रोजी पहाटे ०४.१९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
    • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वीची शेवटची अप लोकल N18 असेल, जी दिनांक ०६.०६.२०२६ रोजी दुपारी १२.१९ वाजता कसारा येथून सुटेल.
    • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतरची पहिली अप लोकल N2 असेल, जी दिनांक ०७.०६.२०२६ रोजी पहाटे ०३.५१ वाजता कसारा येथून सुटेल.

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण सेक्शनवरील मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा