Kalyan East-West Flyover: कल्याणमधील चार पदरी पूर्व-पश्चिम उड्डाणपूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण या पुलाच्या मार्गावरील अडथळे हटवून बांधकामासाठी ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरलेले जागा महापालिकेने ताब्यात घेतली. त्या ठिकाणी तात्पुरती बांधलेली शेड तोडण्यात आली. तिथे असलेल्या गौतम बुद्धाच्या चार मूर्ती स्थलांतरित करण्यात आल्या. यावेळी बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर कब्जा करत महापालिकेने नासधूस केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांचे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी खंडन केले आहे.
आज होणार चर्चा
महापालिकेने उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी शनिवारी कारवाई करत संबंधित जागा ताब्यात घेऊन तिचा ताबा ‘एमएमआरडीए’ला दिला. या जागेवर उभारलेली तात्पुरती पत्र्याची शेड तोडल्यावर बुद्धभूमी फाउंडेशनकडून महापालिकेवर आरोप करण्यात आले होते. या आरोपांचे खंडन करताना महापालिका आयुक्त गोयल यांनी, उड्डाणपूल महापालिकेच्या जागेतून प्रस्तावित आहे. त्यानुसार या पुलाच्या मार्गातील अडथळे दूर केल्याचे सांगितले. तसेच या जागेलगत बुद्धभूमी फाउंडेशनची जागा असून ही जागा देखील त्यांच्या ताब्यात होती, यामुळे बुद्धविहार असलेल्या जागेला संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी व वृक्ष लागवडीसारख्या मागण्यांबाबत महापालिका सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ४ जूनला त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास तयार असून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यास तयार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
Mumbai Monorail: नव्या स्वदेशी बनावटीच्या रेक्स, पूर्वीपेक्षा अत्याधुनिक आणि वेगवान प्रवास; मोनोरेलवर अखेर सुरक्षिततेची मोहोर
सहकार्य न मिळाल्याने कारवाई
या पुलासाठी २३ खांब उभारले जाणार असून यातील १७खांबांचे काम पूर्ण झाले. उर्वरित सहा खांबांच्या बांधकामासाठी ही जागा तातडीने ताब्यात देणे गरजेचे होते. यामुळेच संबंधित फाउंडेशनबरोबर १० वेळा बैठका घेतल्या होत्या. त्यांना या कारवाईची पूर्वसूचना देत तत्पूर्वी हे बांधकाम काढून घेण्याबाबत सांगण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून सहकार्य न मिळाल्याने अखेर ही जागा ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Pune-Bengaluru Highway: तीन भुयारी ‘अंडरपास’मुळे प्रवास सुपरफास्ट, पुणे-बंगळुरू महामार्गावर मंजुरी; पुनावळे, वाकड परिसरात फायदा
या पुलामुळे कल्याणमधील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो या दुकानापासून सुरू होणारा हा उड्डाणपूल विठ्ठलवाडीपर्यंत असेल. हा चार पदरी उड्डाणपूल वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या पुलामुळे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूककोंडी फुटणार आहे. या २.५ किलोमीटर लांबमुळे अंबरनाथ आणि उल्हासनगरवरून येणाऱ्या वाहनांना बिर्ला महाविद्यालयामार्गे बाह्य महामार्गांना जोडण्यात येणार आहे. कल्याणमधील वाधुनी, शहाडसारख्या रेल्वे पुलावरून वाहतूक वळवण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा