• Fri. Jun 5th, 2026
    Census In Maharashtra: घरगणना 70 टक्के; सर्वेक्षणाचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट साध्य, 20 टक्के घरे बंद

    शर्मिला कलगुटकर, मुंबई : डिजिटल पद्धतीने प्रथमच करण्यात आलेल्या जनगणनेमधील घरगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ७० टक्के उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे. शहर आणि उपनगरांतील २० टक्के घरे बंद असून, उर्वरित सुट्टीमुळे गावी किंवा पर्यटनानिमित्त फिरायला गेल्याचे आढळले. हा पहिला टप्पा शुक्रवार, ५ जून रोजी पूर्ण होत असून, बंद असलेल्या घरांची १४ जूनपर्यंत किमान चार वेळा फेरतपासणी करायची आहे. त्यानंतर जनगणनेशी संबंधित पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

    मागील काही वर्षांत शहरामध्ये झालेले समूहांचे स्थित्यंतर, पुनर्विकास प्रकल्पांमुळे कुटुंबाचे झालेले स्थलांतर, घर तसेच मालमत्तेमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे एकापेक्षा अधिक जागा, विभक्त कुटुंबपद्धती या सर्वांचे प्रतिबिंब घरमोजणीमध्ये उमटल्याचा अनुभव प्रगणकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितला.

    Maratha Reservation: मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला, हेल्पलाइन नंबरही जारी
    एका कुटुंबाची दोन वा त्यापेक्षा अधिक मालकीची घरे असतील तर त्यांची गणना कोणत्या पत्त्यावर केली जावी, याची विचारणा करण्यात आली आहे. कुटुंबप्रमुख असे नाव नोंदवण्याचा आग्रहही वाढता असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एका घरामध्ये दोन कुटुंबे राहत असतील तर नोंद करताना सामायिक स्वयंपाकघर हा निकष महत्त्वाचा मानण्यात आला आहे. घरयादीमध्ये संस्था कुटुंबे आणि सामान्य कुटुंबाची नोंद करण्यात आली आहे.

    जनगणना सुरू झाली तेव्हा मुंबईतील अनेक सोसायट्यांमधून प्रगणकांच्या समन्वयकांकडे, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील दूरध्वनी खणखणत होते. सर्वसामान्यांना अनेक शंका होत्या. जनगणना करण्यासाठी या व्यक्तींना नेमून दिले आहे का, कौटुंबिक तसेच घराशी संबंधित माहिती त्यांना द्यायची का, ओळखपत्र इतकाच पुरावा ग्राह्य मानावा का, असे अनेक प्रश्न शहरातील विविध सोसायटी कार्यालयांतून विचारण्यात येत होते. जनगणनेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी या प्रश्नांची उत्तरे अतिशय शांतपणे देण्याचे काम समन्वयकांनी केले. आरोग्य विभागातील कर्मचारी हे विविध आरोग्य उपक्रमांच्या निमित्ताने गृहभेटी, वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने रुग्णालयामध्ये त्यांची भेट होत असते. मात्र शिक्षकांना उन्हातान्हामध्ये घरोघरी जाऊन ही माहिती घेताना त्रास झाला, अशी प्रांजळ भावना जनगणनेच्या संदर्भात जबाबदारी दिलेल्या प्रगणकांनी व्यक्त केली.

    Maharashtra TimesFarmer Loan Waiver: कशी असणार शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया? सरकारचा रोडमॅप तयार; सर्व प्रक्रिया ऑनलाइन, शासन निर्णय जारी
    बेघरांची गणना दुसऱ्या टप्प्यामध्ये
    वसतिगृहे, हॉटेल, वृद्धाश्रम, बालगृह, अनाथालय, तुरुंग, खानावळी याचा समावेश संस्था कुटुंबामध्ये करण्यात आला. उघड्या जागेमध्ये, रस्त्याच्या कडेला, धार्मिक स्थळाच्या जागांवर, उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या बेघरांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

    अॅपने दिली साथ
    घरगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हा एचएलओ अॅपमध्ये अनेक अडचणी येत होत्या. नेटवर्क नसल्यानेही प्रगणकांना कागद-पेनाने नोंदी घेऊन पुन्हा त्या अपलोड कराव्या लागत असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने निदर्शनास आणून दिले होते. या त्रुटीची दखल घेऊन त्यात सुधारणा करण्यात आल्याने हा व्यत्यय कमी झाल्याचे प्रगणकांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यातील जनगणनेसाठी प्रगणकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesSanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी कलाटणी, ‘पश्चात्ताप झाला असेल तर मातोश्रीवर या’, संजय राऊत यांचं वक्तव्य
    घराला कोणते पत्रे घातलेत?

    घरगणना करण्यासाठी प्रगणकांनी घराच्या भिंती, छप्पर, जमीन यासाठी कोणते साहित्य वापरले अशाही सूक्ष्म नोंदी केल्या आहेत. छत पक्के की त्याला पत्रे घातलेले आहेत, पेनकुलू, कवेलू, देशी नाळीया, हाताने बनवलेली कौले अशा कोणत्या प्रकाराचा वापर छपराच्या साहित्यासाठी केलेला आहे त्याचीही नोंद करण्यात आली. काही घरांना डागडुजीची गरज असते. जीर्ण झालेल्या, तसेच मोडकळीस आलेल्या घरांची माहितीही घरगणनेमध्ये करण्यात आली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed