• Fri. Jun 5th, 2026
    दोन विवाह मोडले, प्रेमसंबंधानंतर लिव्ह इन रिलेशन, पुण्यातील प्रीतीची भीती, तरुणाने भलतंच केलं

    Pune Live in Partner Cheating : प्रीतीचे यापूर्वी दोन विवाह झाले होते, मात्र वैवाहिक आयुष्यात मतभेद झाल्यानंतर ती वेगळी राहत असल्याचे तपासात समोर आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी करण्यात आली. या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    करण बाळासाहेब कांबळे (वय २८, मूळ रा. खरबा, ता. मानवत, जि. परभणी) असे आयुष्याची अखेर केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रीती अनिकेत बोंढर्डे ऊर्फ रमिसा ऊर्फ माही ऊर्फ प्रीती सुधीर रणदिवे (वय ३१, रा. थिटे वस्ती, खराडी), अनिकेत बोंढर्डे (वय ४१, रा. जेधेनगर, बिबवेवाडी), संस्कृती सुधीर रणदिवे (वय २५) आणि ऋत्विक सुधीर रणदिवे (वय २६, दोघे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत करणचा भाऊ कृष्णा कांबळे (वय ३४) यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    प्रीतीचे दोन विवाह

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण आणि प्रीती यांची काही काळापूर्वी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि दोघेही खराडीतील थिटे वस्ती परिसरात एकत्र राहत होते. प्रीतीचे यापूर्वी दोन विवाह झाले होते. वैवाहिक आयुष्यात मतभेद झाल्यानंतर ती वेगळी राहत असल्याचे तपासात समोर आले आहे.
    Maharashtra TimesST Bus Accident : ताई, लहान लेकरं आहेत, मागच्या बसने या; ST ड्रायव्हरने उतरवलं, पाटील कुटुंब अपघातातून बचावलं, ‘त्या’ देवदुताचा मात्र अंत

    करणचं टोकाचं पाऊल

    सततच्या त्रासामुळे आणि धमक्यांमुळे नैराश्यात गेलेल्या करणने सोमवारी (एक जून) खराडीतील राहत्या घरात गळफास घेऊन जीव दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर त्याच्या भावाने पोलिसांकडे धाव घेतल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

    फसवी कर्जमाफी, महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार; रोहित पवारांचा महायुती सरकारला इशारा

    तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.
    Maharashtra TimesST Bus Accident : माझ्या डोळ्यादेखत त्यांनी प्राण सोडले, एसटी अपघातातून बचावलेल्या प्रवाशाची आपबिती, काही क्षण अगोदर काय घडलं?

    पैसे न दिल्यास अत्याचाराचा गुन्हा

    प्रीतीचा पहिला पती अनिकेत बोढर्डे; तसेच तिचा भाऊ आणि बहीण यांनी करणवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती. पैसे न दिल्यास अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अडचणीत आणण्याची धमकी दिली जात होती. या प्रकारामुळे करण प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा