• Fri. Jun 5th, 2026
    Solapur Accident: रोलर अंगावरुन गेल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; बार्शीतील क्रिकेट शिबिरातील धक्कादायक घटना

    Solapur Accident: मैदानावरील उपस्थितांनी मित्रांनी आरवला तातडीने उपचारासाठी बार्शी येथील ‘जगदाळे मामा हॉस्पिटल’ येथे नेले. मात्र, अतिरक्तस्राव आणि गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आरवची प्राणज्योत मालवली होती.

    सोलापूर अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, सोलापूर: बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक दुर्घटना घडली आहे. क्रिकेट खेळपट्टी दाबण्यासाठी वापरण्यात येणारा सुमारे ३५० किलो वजनाचा अवजड लोखंडी रोलर अंगावरून गेल्याने आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय १५, रा. सुभाषनगर, बार्शी) या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

    या घटनेत क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देवडवार (दोघेही रा. बार्शी), संतोष ठोंबरे व मातृभूमी प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ आणि बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन मंडळाच्या सर्व संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रचंड खळबळ उडाली असून, पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

    Maharashtra TimesSupriya Sule: काँग्रेसचे नेते पवारांच्या राष्ट्रवादीवर संतापले, सुप्रिया सुळेंसमोर जाहीर नाराजी; पुण्यात मविआच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
    आरवचे वडील योगीराज नारायण चौधरी (वय ४५) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ‘मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी’ आणि ‘बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन मंडळा’च्या वतीने सहा ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी आरवच्या वडिलांनी ३,५०० रुपये फी भरली होती.

    Maharashtra TimesLadki Bahin Yojana: ‘लाडक्या बंधूं’ना दणका! लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे 14 हजार पुरुष कचाट्यात, सरकार पैसे वसूल करणार?
    ३० मे रोजी सकाळी मैदानावर सराव सुरू असताना, खेळपट्टी व्यवस्थित करण्यासाठी तिथे असलेला अवजड लोखंडी रोलर फिरवण्याचे ठरले; परंतु रोलर चालवण्यासाठी कोणतीही मोठी व्यक्ती, ट्रॅक्टर किंवा तज्ज्ञ मजूर मैदानावर उपस्थित नव्हता. मैदानावर उपस्थित असलेले क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देवडवार यांनी १२ ते १५ वर्षे वयोगटातील लहान मुलांनाच रोलर ओढण्यास सांगितले. अचानक आरवचा पाय घसरला आणि तो खेळपट्टीवर खाली पडला. रोलरचा वेग आणि प्रचंड वजन यामुळे इतर लहान मुलांना रोलर तत्काळ रोखता आला नाही. परिणामी, तो रोलर थेट आरवच्या छातीवरून आणि पायावरून गेला. या भीषण अपघातात आरवच्या शरीराला गंभीर अंतर्गत दुखापत झाली आणि अंतर्गत अवयव निकामी होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. मैदानावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आरवला पाहून इतर मुलांनी आणि पालकांनी एकच हंबरडा फोडला.

    या संपूर्ण दुर्घटनेला क्रिकेट कॅम्पचे आयोजक आणि प्रशिक्षक यांचा अक्षम्य निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप आरवच्या वडिलांनी केला आहे. बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश अंबादास गळगटे तपास करीत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा