• Tue. Jun 16th, 2026
    Maharashtra Weather: राज्यात हवामानाचा डबल अटॅक, मान्सूनपूर्व पाऊस 18 जिल्ह्यांना झोडपणार! मुंबई-उपनगरांत कशी असेल स्थिती?

    Maharashtra Weather, rain alert: महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काय इशारा आहे, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हालचाल वाढू लागली असून हवामान विभागाने ३ जूनसाठी अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

    कुठे काय स्थिती असणार?

    कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात.

    पावसाचा यलो अलर्ट

    उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांसाठी कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    Maharashtra TimesRatnagiri News: 41 विद्यार्थ्यांची सहल, पण एकजण परतलाच नाही; आरे समुद्रात कोल्हापूरचा अतुल बुडाला, दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ

    पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी काही भागांत पावसाच्या सरी पडू शकतात.

    मराठवाड्यात यलो अलर्ट, नांदेडमध्ये हलक्या सरी

    मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

    विदर्भात मेघगर्जना, खबरदारीचे आवाहन

    विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा