Manoj Jarange: बुधवारी पाटोद्यातून श्रीगोंदाकडे त्यांचा प्रवास होणार होता. मात्र, गेल्या १९ दिवसांपासून उपोषण करीत असल्याने त्यांची प्रकृती बिघडली.
मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथून मुंबईत आंदोलन करण्यासाठी मंगळवारी निघाले. रात्री उशिरा बीड जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित मुक्कामासाठी ते पाटोदा येथे पोहोले. पाटोद्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
Eknath Shinde | ‘आमच्यावर टीका करण्याचा अधिकार,पण…’, शिंदे जरांगेंवर बोलले! | Manoj Jarange Patil
जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंके यांनी वैद्यकीय पथकासह पाटोदा येथे जाऊन जरांगे पाटील यांची तपासणी केली. त्यांचा रक्तदाब खूप कमी होता. शरीरातील पाण्याची पातळई कमी झाल्याची माहिती सोळंके यांनी दिली. ‘मी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. प्रवास टाळून वैद्यकीय उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला,’ असेही सोळंके यांनी सांगितले.
दरम्यान, जरांगे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. नारायणगडाचे ह. भ. प.शिवाजी महाराज यांनी विनंती केल्यानंतर आपण त्यांचा मान ठेवून सलाईन घेतले, असे जरांगे म्हणाले. ‘आजऐवजी मी आता उद्या दुपारी एकच्या सुमारास मुंबईला नियोजित दौऱ्यावर निघणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या असल्या, तरी हैदराबाद जीआरमध्ये सुधारणा, सातारा कोल्हापूर गॅझेटबद्दल कालबद्ध अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, तरच आंदोलन मागे घेतले जाईल, अन्यथा मुंबईच्या आंदोलनावर आपण ठाम आहोत,’ असे जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं, म्हणाले, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने नाव जोडण्याचा प्रयत्न‘सरकारने हैद्राबाद गॅझेट जीआर सुधारित करून द्यावा, ५८ लाख नोंदीला धक्का लागणार नाही याची ग्वाही द्यावी आणि कुणबी प्रमाणपत्राला व्हॅलिडिटीची अडचण येणार नाही याचाही विश्वास द्यावा. सातारा आणि कोल्हापूर गॅझेट कधी देणार याची हमी द्यावी,’ अशा मागण्या जरांगे यांनी केल्या.‘सरकारकडून नवीन मसुदा आला आहे अशी माहिती मिळते आहे. राज्य सरकारचा मसुदा पाहून त्याबाबत बोलतो. मात्र, जे पाटोद्यात थांबले ते गावाकडे जातील, मला मुंबईला जाण्यापासून अडवल्यावर मी तुम्हाला बोलावून घेतो,’ असे सांगून, जरांगे यांनी त्यांच्या ताफ्यामागे आलेल्या मराठा आंदोलकांना गावाकडे परतण्यास सांगितले.
Devendra Fadnavis : ‘मी शेतकऱ्यांच्या पाठीशी’; दुष्काळाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ग्वाही, CM फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहितीगणेशोत्सवात गैरसोयीची भूमिका टाळा
‘मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. उर्वरित एका मागणीबाबत कायदेशीर अडचण असल्याने तत्काळ निर्णय घेणे शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यासह राज्यातील नागरिकांची गैरसोय किंवा कायदा-सुव्यवस्थेवर ताण निर्माण होईल, अशी कोणतीही भूमिका घेऊ नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जरांगे पाटील यांना केले.
