• Fri. Jun 5th, 2026

    Maharashtra Rain : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बारामतीत महिलेचा बळी, तर जळगावात आंदोलकांवर कोसळला मंडप

    Maharashtra Rain : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बारामतीत महिलेचा बळी, तर जळगावात आंदोलकांवर कोसळला मंडप

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळत आहे. बारामतीत तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक शेळ्यादेखील दगावल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बारामती : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (2 जून) अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळाला. तक काही ठिकाणी अचानक आलेल्या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली बघायला मिळाली. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात अवकाळी पावसाने एका महिलेचा बळी घेतला आहे. भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक शेळ्यादेखील दगावल्याची घटना घडली आहे.

    बारामती तालुक्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच आज पुन्हा झालेल्या पूर्वमोसमी पावसाने एक दुर्दैवी घटना घडली. तालुक्यातील माळवाडी गावात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नंदा लडकत (रा. माळवाडी) या महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी नंदा लडकत आणि् अन्य एक महिला गावातील पत्र्याच्या शेडमध्ये आश्रयासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी शेडची भिंत अचानक कोसळली आणि दोघीही ढिगाऱ्याखाली अडकल्या.

    स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून दोघींना बाहेर काढले. मात्र, नंदा लडकत यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसरी महिला किरकोळ जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत शेडमध्ये असलेल्या 13 ते 15 शेळ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

    दरम्यान, बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती, पशुधन आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही घटना परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

    अहिल्यानगरमध्ये करंजीच्या बाजारपेठेत तारांबळ

    अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मंगळवारी भरलेल्या आठवडे बाजारावर अचानक आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः कहर केला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने हजेरी लावताच बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. भाजी विक्रीसाठी आलेले शेतकरी, खरेदीसाठी आलेल्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी आडोशासाठी धावाधाव करताना दिसून आले. बटाटे, टोमॅटो, मिरच्या, वांगी, भेंडीसह विविध फळभाज्या विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

    अचानक झालेले मुसळधार पावसामुळे अनेकांचा भाजीपाला पाण्यात भिजून खराब झाला, तर काहींचा माल वाहून जाण्याची वेळ आली. दिवसभर उन्हात बसून माल आणायचा आणि शेवटी पावसात सगळं वाहून गेले अशी हतबल प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वादळी वाऱ्यामुळे व्यापाऱ्यांनी उन्हापासून बचावासाठी उभारलेले प्लॅस्टिक शेड, ताडपत्र्या आणि छत्र्या हवेत उडून गेल्याने बाजारातील परिस्थिती आणखी बिकट झाली. काही विक्रेत्यांना माल टाकून सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली.

    नाशिककरांना दिलासा! शहरात पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून दिलासा

    दुसरीकडे नाशिककरांना अखेर उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता आणि उकाडा जाणवत होता. शहरातील कमाल तापमान आठवडाभर ३६ अंशांच्या आसपास स्थिर होते. दरम्यान, आज शहरात दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला आहे. काल नाशिकमध्ये कमाल तापमान ३७ पूर्णांक १ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ पूर्णांक ४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, पुढील काही दिवस हवामानात बदल कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    जळगावमध्ये आंदोलकांवर कोसळला मंडम

    जळगावमध्ये वादळामुळे मंडप कार्यकर्त्यांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली आहे. उपनिबंधक कार्यालयासमोर काही आंदोलक आंदोलन करत बसली होती. यावेळी वादळी वाऱ्यामुळे मंडप आंदोलकांच्या अंगावर पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा