• Sat. Jun 6th, 2026

    ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 2, 2026
    ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या मे २०२६ या अंकाचे प्रकाशन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव तथा अतिथी संपादक आप्पासो धुळाज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, कक्ष अधिकारी प्रशांत वामन, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे सल्लागार कार्तिक पांडे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    ‘आपलं मंत्रालय’च्या नव्या अंकामध्ये विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीतील तंत्रज्ञान, सामाजिक संवेदनशीलता आणि सर्वसमावेशक विकासाचा वेध घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास यांसारख्या विविध विषयांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे; तसेच सांस्कृतिक, भावनिक आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारे लेखही वाचकांसाठी विशेष आकर्षण ठरणारे आहेत.

    मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गृहपत्रिका प्रकाशनाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

     

    00000

    अश्विनी पुजारी/स.सं

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed